फिफाचा ‘जबरा’ फॅन… कबीर खान!

फिफाचा ‘जबरा’ फॅन… कबीर खान!

दिग्दर्शक कबीर खान

आजपासून ‘फिफा वर्ल्ड कप २०१८’ ची धामधूम सुरू होत आहे. रशियामध्ये होत असलेल्या फिफा वर्ल्डकपचा फिव्हर फुटबॉलप्रेमींवर चढायला लागला आहे. यामध्ये सिने क्षेत्रातील सेलिब्रिटीही मागे नाहीत. असाच एक जबरा फॅन ‘फिफा वर्ल्ड कप २०१८’ चा अंतिम सामना पाहण्यासाठी रशियाला जाणार आहे. बॉलीवूड दिग्दर्शक कबीर खान फुटबॉल खेळाचा चाहता असून यंदाच्या फिफाला तो हजेरी लावणार आहे. कबीरने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर फायनलचे तिकिट पोस्ट करून फिफाचा अंतिम सामना पाहायला जात असल्याचे सांगितले आहे.

‘लहानपणीचे स्वप्न पूर्ण…’ 

कबीर खानने इन्स्टा पोस्टमध्ये ‘फिफा वर्ल्ड कप २०१८’ च्या अंतिम सामन्याचे तिकीट शेअर केले आहे. फिफाचा अंतिम सामना १५ जुलै रोजी मॉस्कोमधील लुझनिकी स्टेडियमवर होणार असून कबीरने त्याच्या फोटोसह स्वतःच नाव आणि सीट नंबरही पोस्ट केला आहे. फिफाचा सामना प्रत्यक्ष पाहण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे, असे कबीरने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

सलमान खान आणि कबीर खान (प्रातिनिधीक चित्र)

‘भाईजान’चा फेव्हरिट कबीर खान
कबीर खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या फेव्हरिट दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्या दोघांनी ‘एक था टायगर’,  ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्युबलाइट’, ‘टायगर जिंदा है’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. कबीर खान यांनी दिग्दर्शन क्षेत्राची सुरूवात १९९९ साली ‘दि अनफॉर्गेटन आर्मी’ या डॉक्यूमेन्ट्रीने केली होती.

First Published on: June 14, 2018 11:25 AM
Exit mobile version