पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित ‘मन बैरागी’चे पहिले पोस्टर रिलीज

पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित ‘मन बैरागी’चे पहिले पोस्टर रिलीज

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६९व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलीवूडकरांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मन बैरागी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. अभिनेता प्रभास याने ट्विटरवर ट्विट करत हे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील माहित नसलेल्या गोष्टी या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. संजय त्रिपाठी निर्मित या चित्रपटाची दिग्दर्शनाची जबाबदारी संजय लीला भंसाळी आणि महावीर जैन यांनी सांभाळली आहे.

फर्स्ट लूक सादर करताना आनंद होतोय

प्रभासने ट्विट केलेले पोस्टर पाहून अभिनेता अक्षय कुमारला देखील आनंद झाला. याबाबत त्याने ट्विटद्वारे सांगितले. अक्षयने ट्विटरवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत लिहिले की, “आमच्या पंतप्रधानांच्या जन्मदिनी त्यांच्या जीवनातील डिफायनींग मोमेंट्सवर आधारित संजय लीला भन्साळी आणि महावीर जैन यांचा स्पेशल फीचर ‘मन बैरागी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक सादर करताना आनंद होत आहे.”

हेही वाचा – आरेतील मेट्रो कारशेडला बिग बी यांचा पाठिंबा!

चित्रपट तरुणांना प्रेरणा देईल

माध्यमांच्या रिपोर्टनुसार, एका तासाच्या या चित्रपटात पंतप्रधान मोदी यांच्या जीवनातील निर्णायक क्षण दाखवण्यात येणार आहेत. चित्रपटात नरेंद्र मोदी यांच्या किशोरवयीन काळातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील मुख्य पात्र स्वतःला शोधताना जीवनात पुढे जातो आणि एक दिवस खंबीर नेता बनतो. नवोदित कलाकार अभय वर्मा या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारत आहे. या वर्षातच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंतप्रधानांच्या जीवनावर बनलेला हा चित्रपट तरुणांना चित्रपटाशी जोडण्याबरोबरच त्यांना प्रेरणा सुद्धा देईल.

First Published on: September 17, 2019 7:15 PM
Exit mobile version