घरमनोरंजनआरेतील मेट्रो कारशेडला बिग बी यांचा पाठिंबा!

आरेतील मेट्रो कारशेडला बिग बी यांचा पाठिंबा!

Subscribe

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत एक प्रसंग सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. आणि अप्रत्यक्षपणे मेट्रो कारशेडला पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई मेट्रो -३च्या प्रस्तावित कारशेडच्या बांधकामात आड येणारी झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी देण्यात आली असली तरी आरेतील ही झाडे कापण्यास पर्यावरणवादी संस्थांकडून तीव्र होत आहे. आरेतील ही झाडे कापण्यावरून वातावरण तापले जात असतानाच ८१ टक्के लोकांनी आरेतील ही झाडे कापली जावू नये, असेच मत नोंदवले आहे. अरेतील झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी कलाकारांनी देखील आवाज उठवला आहे पण बिग बी अमिताभ बच्चन यांनी आरेतील कारशेडला ट्वीट करत पाठिंबा दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत एक प्रसंग सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. बिग बी म्हणतात, ‘माझ्या एका मित्राला मेडिकल इमरजन्सी होती. त्याने कार ने हॉस्पिटला जाण्याऐवजी मेट्रोचा पर्याय निवडला. मेट्रोने प्रवास केल्यानंतर तो खूप खूश होऊन परत आला. मेट्रो ही खूप फास्ट, सोयिस्कर आणि कार्यक्षम आहे. आणि प्रदूषणावर उपाय म्हणून आपण जास्तीत जास्त झाडं लावूयात. मी माझ्या बागेपासून सुरूवात केली आहे. तुम्हीही करा’.

- Advertisement -

त्यामुळे मोदींनी अशा आशयाचे ट्वीट करत अप्रत्यक्षपणे आरेतील कारशेडला पाठिंबा दर्शवला आहे. सध्या मुंबईकरांकडून सेव्ह आरेची मुख्य मागणी होत आहे.
मेट्रो शेड तर थांबवूच पण इतर कुठल्याही प्रोजेक्टला आत घुसू देणार नाही असा इशारा देखील देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -