‘हे’ पाच मराठी चित्रपट दिसणार इफ्फी महोत्सवात!

‘हे’ पाच मराठी चित्रपट दिसणार इफ्फी महोत्सवात!

भारतातील नामांकित चित्रपट महोत्सव म्हणून ओळख असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा गोव्यात रंगणार आहे. १९५२ साली सुरू झालेला या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वं वर्ष असून यात वेगवेगळ्या देशांमधील २०० पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके जाहीर झाला आहे, त्यामुळं अमिताभ बच्चन यांचे दर्जेदार चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ५ मराठी चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

‘आनंदी गोपाळ’ चित्रपट

हा महोत्सव २० नोव्हेंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवात यावेळी विविध प्रादेशिक भाषांमधील २६ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी महोत्सवामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांबरोबरच प्रादेशिक भाषांतील २६ चित्रपटांचाही समावेश आहे. तसंच, १५ नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. ५०वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.

या पाच मराठी चित्रपटांची वर्णी

सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला ‘, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ ‘, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राईम नंबर १०३|२००५ , आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो प्रेम ‘ या मराठी चित्रपटांचा समावेश आहे ५० व्या इफ्फी महोत्सवात करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या ४९ व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘इंडियन पॅनारोमा फीचर फिल्म’ विभागात २२ चित्रपटांपैकी केवळ २ आणि २१ नॉन फीचर फिल्मपैकी ८ मराठी लघुपटांची निवड करण्यात आली होती.

First Published on: October 7, 2019 2:02 PM
Exit mobile version