Video : तरुणाच्या दैनंदिन जीवनातील काय आहे ‘FOMO’!

Video : तरुणाच्या दैनंदिन जीवनातील काय आहे ‘FOMO’!

फोमो मराठी वेब सीरिज

आजच्या युथचे प्रश्न वेगळे, त्यांच्या समस्या वेगळ्या, विचार करायची पद्धतही वेगळी आणि प्रश्न सोडवण्याचे मार्गही वेगळेच. अशाच काही तरुणांच्या जीवनातील चढ-उतार फोमो या मराठी वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शुद्ध देसी मराठी यांची निर्मिती असलेल्या फोमोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून स्वःत्वाचा शोध घेणाऱ्या तरुणांची गोष्ट यामध्ये दाखवली आहे. अभिनेत्री पर्ण पेठे यामध्ये प्रमुख भूमिका साकारत असून याचे लेखन आणि दिग्दर्शन सुशांत धरवाडकर आणि चिन्मय कुलकर्णी यांनी केले आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी ही सीरिज यु ट्यूबवर प्रदर्शित होत आहे.

First Published on: October 15, 2019 12:22 PM
Exit mobile version