अमेरिकन मॉडलची इमारतीच्या 60 व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या

अमेरिकन मॉडलची इमारतीच्या 60 व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या

अमेरिकन मॉडलची इमारतीच्या 60 व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या

मिस यूएसए 2019 आणि अमेरिकन मॉडेल चेल्सी क्रिस्टने इमारतीच्या 60 व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तिने आत्महत्येच्या काही तास आधी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. चेल्सी नेहमी मानसिक आरोग्याबाबत आपले मत व्यक्त करायची.

डेलीमेलच्या वृत्तानुसार, 30 वर्षीय चेल्सी क्रिस्टने मॅनहॅटनमध्ये सकाळी 7.15 वाजता (यूएस वेळेनुसार) आत्महत्या केली. 60 मजली ओरियन इमारतीच्या 9 व्या मजल्यावर तिचे अपार्टमेंट होते. मात्र 29 व्या मजल्यावर ती शेवटची दिसली होती. अलीकडेच भारताची हरनाज कौर संधू मिस युनिव्हर्स बनली तेव्हा तिने तिच्यासोबतचा एक फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

2019 मध्ये, चेल्सी क्रिस्टने नॉर्थ कॅरोलिनाचे प्रतिनिधित्व करत मिस यूएसए 2019 चे विजेतेपद पटकावले. ती पेशाने एक वकील होती. नॉर्थ आणि साउथ कॅरोलिनामध्ये लॉची प्रॅक्टिस करत होती. ती सामाजिक आणि फौजदारी न्याय सुधारणांच्या बाजूने होती. मिस यूएसए 2019 झाल्यानंतर ती एक्सस्ट्रा नावाच्या एका शोची वार्ताहर बनली, अनेक मुलाखतींमध्ये ती मानसिक आरोग्यावर भाष्य करायची.

आत्महत्येपूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत लिहिले की, ‘हा दिवस तुमच्यासाठी आराम आणि शांती घेऊन येवो’. पोलिसांना तिच्या घरातून एक सुसाईट नोट लिहिली आहे. यात तिने आपल्या नावावरील सर्व गोष्टी आई एप्रिल सिम्पकिन्सच्या नावे करण्यास सांगितले आहे. मात्र तिने आत्महत्या का केली? या खुलासा या सुसाईटमध्ये लिहिलेला नाही.


शेलार, भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का? महापौरांचे भाजपावर टीकास्त्र

First Published on: January 31, 2022 2:45 PM
Exit mobile version