सहदेव ते रानू मंडलपर्यंत रातोरात प्रसिद्ध झाले ‘हे’ स्टार, पण आता करतात तरी काय?

सहदेव ते रानू मंडलपर्यंत रातोरात प्रसिद्ध झाले ‘हे’ स्टार, पण आता करतात तरी काय?

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणी कधी आणि कशामुळे प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीला प्रसिद्ध व्हायचे असल्यास सोशल मीडिया त्यासाठी उत्तर मार्ग ठरला आहे. मागच्या काही काळात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे काही व्यक्ती रातोरात स्टार झाल्यात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. सहदेव दिर्दोपासून रानू मंडलपर्यंत सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेल्या व्यक्ती कोण आहेत आणि सध्या त्या करतात तरी काय जाणून घेऊया.

सहदेव दिर्दो


‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मेरा भूल नही जाना’ या ३० सेकंदाच्या व्हिडिओत हे गाण गाणारा सहदेव दिर्दो हा रातोरात स्टार झाला. छत्तीसगडच्या छोट्या गावात राहणाऱ्या छोट्या सहदेव दिर्दोच्या गाण्याने सोशल मीडिया दणाणून सोडला. देशातील प्रत्येक घराघरात बचपन का प्यार पोहचल आणि सहदेव दिर्दो रातोरात स्टार झाला. त्यानंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर बादशाहने सहदेवच्या बचपन का प्यारवर एक रॅप साँग बनवल. सहदेवचा नुकताच एक रोड अपघात झालाय. त्या तो गंभीररित्या जखमी झालाय. सहदेववर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत देखील सुधारणा होत आहे.

 

रानू मंडल

रानू मंडलला कोण ओळखत नाही. मागच्या २ वर्षांत रानू मंडल हे नाव सतत चर्चेत राहीले. २०१९मध्ये पश्चिम बंगलच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकरांच ‘एक प्यार का नगमा हे’ गाण गाणाऱ्या रानू मंडलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि रानू मंडल रातोरात सोशल मीडिया स्टार झाली. रानू मंडलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध सिंगर आणि कंपोझर हिमेश रेशियाने रानू मंडलला गाण्याची ऑफर दिली. हिमेश रेशमियाने त्याच्या एका अल्बममध्ये रानू मंडलच्या आवाजात ३ गाणी रेकॉर्ड केली. ‘तेरी मेरी कहाणी’ हे रानू मंडलच्या आवाजातल गाणं सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालं होतं.

रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर मोहम्मद रफी यांची गाणी गाऊन रोजी रोटी चालवणारी रानू मंडल एका व्हिडिओमुळे प्रसिद्ध झाली. तिच्या राहण्यापासून दिसण्यापर्यंत सगळ्या गोष्टी बदलल्या. एका एव्हेंटमध्ये रानू मंडल हेवी मेकअप मध्ये दिसली होती. रानू मंडल सध्या नव्या गाण्यासाठी तयारी करतेय असे म्हटलं जातय.

 

दानानीर मोबीन

पावरी हो रही हा व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांनी अक्षर: डोक्यावर घेतला होता. अनेक सेलिब्रेटींनी यावर रिक्रिएट व्हिडिओ केले होते. पाकिस्तानी गर्ल दानानीर मोबीन आपल्या फ्रेंड्स सोबत फिरायला गेली होती तेव्हा तिने शूट केलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या नजरेस पडला. ‘ये हमारी कार है आणि ये हम है आणि ये हमारी पावरी हो रही’. पार्टीला पावरी म्हणारी ही मुलगी नेटकऱ्यांच्या भलतीच पसंतीस पडली. आणि त्यानंतर सिंगर कंपोझर यशराज मुखाते याने हा व्हिडिओवर रिक्रिएट केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वाधिक प्रसिद्ध झाला होता. या व्हिडिओमुळेच दानाबीर मोबीन ही रातोरात सोशल मीडियावर स्टार झाली होती.

दानानीर मोबीनचा पावरी हो रही या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी तिला डोक्यावर घेतले. दानानीरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्याचे सांगण्यात येतेय. दानानीरने पाकिस्तानी सीरियल Sinf – e – Aahan मध्ये काम केले आहे.

योहानी

२०२१मध्ये सोशल मीडियावर  सर्वाधिक गाजलेलं गाणं म्हणजे मणिके मागे हिते. श्रीलंकीय गायिका योहानीच्या आवाजातल मणिके मागे हिते हे या गाण्याने योहानी एका रात्रीत केवळ श्रीलंकेत नाही संपूर्ण जगभरात पोहचली. योहानीच्या आवाजातील सिंहल भाषेतील हे गाण नंतर अनेकांनी इतर भाषांमध्ये करण्याचा प्रयत्न केला मात्र योहानीच्या गाण्याला कुठेच तोड नाही. इन्स्टाग्रामवर या गाण्याने सगळे रेकॉर्ड्स तोडले होते. अनेक कलाकार या गाण्याच्या रिल्सवर थिरकताना दिसले होते.

या गाण्यानंतर योहानीला अनेक रिअँलीटी शोमध्ये बोलावण्यात आले. योहानी येत्या काळात बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. भूषण कुमार – इंदर कुमार यांच्या थॅक गॉड या सिनेमात योहानी दिसणार आहे. मनिके मागे हिते या गाण्याचे हिंदी वर्जन योहानीच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. २०२२मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

संजीव श्रीवास्तव ( डान्सिंग अंकल )

लग्नात आपल्या बायकोसोबत नाचणाऱ्या डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डान्सिंग अकंल रातोरात सोशल मीडिया स्टार झाले होते. गोविंदाच्या प्रसिद्ध ‘आप के आ जाने से’ या गाण्यावर डान्सिंग अंकलनी तूफान डान्स केला होता. त्यानंतर त्यांनी अनेक रिअॅलिटी शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले


हेही वाचा – sahdev Dirdo Accident: बचपन का प्यार फेम सहदेव दिर्दोचा भीषण अपघात, डोक्याला गंभीर दुखापत

 

First Published on: December 30, 2021 5:04 PM
Exit mobile version