घरट्रेंडिंगsahdev Dirdo Accident: बचपन का प्यार फेम सहदेव दिर्दोचा भीषण अपघात, डोक्याला...

sahdev Dirdo Accident: बचपन का प्यार फेम सहदेव दिर्दोचा भीषण अपघात, डोक्याला गंभीर दुखापत

Subscribe

बचपन का प्यार गाण्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला सहदेव दिर्दोचा ( sahdev Dirdo Accident)  मंगळवारी भीषण अपघात झाला असून सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. सहदेव मित्रांसोबत स्कूटीवर ट्रिपर सिट जात असताना त्यांचा अपघात झाला. सहदेवला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. एसपी सुनील शर्मा आणि कलेक्टर विनीत नंदनवार यांनी जिल्हा रुग्णालयात सहदेव तात्काळ आणि योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

मंगळवारी संध्याकाळी सहदेव दिर्दो त्याच्या मित्रांसोबत ट्रिपल सीट स्कूटीवरुन शबरी नगरच्या दिशेने जात होता. रस्त्यातील खड्डे आणि मातीमुळे अचानक सहदेवचे स्कूटीचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. सहदेव स्वत: स्कूटी चालवत होता असे सांगितले जात आहे. अपघातात सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्याचप्रमाणे त्याच्या शरीरावर देखील अनेक जखमा झाल्यात. रुग्णलयातील सहदेवचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात सहदेव वेदना सहन होत नसल्याने रडताना दिसत आहे.

‘बचपन का प्यार’ व्हायरल सॉंगचे येणार रॅपर बादशाह – सहदेव व्हर्जन

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार सहदेवला दिर्दोला चांगल्या उपचारांसाठी जगदलपूर येथे शिफ्ट केले जाऊ शकते. कारण सहदेवच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून सध्याच्या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने त्याला दुसऱ्या रुग्णलयात शिफ्ट केले जाऊ शकते अशी माहिती त्याच्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

सहदेवच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बादशहाने देखील ट्विट करत सहदेवच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. मी सहदेवच्या कुटुंब आणि मित्रांच्या संपर्कात आहे. तो सध्या बेशुद्ध अवस्थेत असून आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे.

बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे गाण्यामुळे सहदेव दिर्दो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशहा देखील सहदेवच्या प्रेमात पडला. सहदेवने बादशहाच्या एका म्युझिक अल्बममध्ये काम केले. बचपन का प्यार गाण्याच्या लिरिक्सवर सहदेवसोबत बादशहाने गाणे तयार केले.

Viral Video: सहदेवच्या आवाजात ऐका ‘मनी हाइस्ट’मधील ‘बेला चाओ’ गाणं

 


हेही वाचा –  ‘बचपन का प्यार’ गाणं नेमकं आलं कुठून? पहा बचपन का ओरिजिनल प्यार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -