Big Boss ७ ची विजेती गौहर लवकरच विवाह बंधनात

Big Boss ७ ची विजेती गौहर लवकरच विवाह बंधनात

Big Boss ७ ची विजेती आणि टेलिव्हिजन विश्वात नेहमी चर्चेत असलेली गौहर खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. अभिनेत्री अभिनेत्री इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबार याच्याशी लग्न करणार आहे. २५ डिसेंबर रोजी गौहर आणि झैद यांचा विवाह पार पडणार असून यावेळी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन हा सोहळा होणार आहे. झैद दरबार आणि गौहरने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

अभिनेत्री गौहर खान म्यूझिक कंपोझर इस्माइल दरबार यांचा मुलगा आणि प्रसिद्ध टिकटॉकर झैद दरबारला डेट करण्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगल्या होत्या. आता या कलाकारांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

इन्टाग्रामवर गौहरने तिच्या प्री-वेडिंगचे फोटोशूट तिच्या चाहत्यांसह शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना तिने एक मेसेज देखील लिहीला आहे. ‘२०२० हे वर्ष साधारण असून आमची लव्हस्टोरी अनोखी ठरली. आम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की आम्ही एक नवा प्रवास सुरू करतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हे स्पेशल दिवस परिवारासह घालवत आहोत. मात्र तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला हवेत’


सारा घालतेय एवढ्या महागातले जॅकेट आणि ट्राउजर!

First Published on: December 1, 2020 3:32 PM
Exit mobile version