Sushant Singh Rajput : ‘कॉफीत ४ ड्रॉप टाक, त्याला किक बसेल’; रियाला आलेल्या मेसेजने खळबळ!

Sushant Singh Rajput : ‘कॉफीत ४ ड्रॉप टाक, त्याला किक बसेल’; रियाला आलेल्या मेसेजने खळबळ!

NCB ने केली आणखी अटक

भाजपचे राज्यसभेतले खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सुशांतच्या पोटातलं विष सापडू नये म्हणून त्याचा पोस्ट मार्टेम उशिरा केला गेला असा दावा केल्यानंतर आता Sushant Singh Rajput Suicide प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय. या प्रकरणात आत्तापर्यंत समोर आलेल्या फॅक्ट्सपेक्षा ही बाब सगळ्यात जास्त खळबळ उडवणारी आणि धक्कादायक अशी मानली जात आहे. सुशांतची गर्लफ्रेंड Rhea Chakraborty चे व्हॉट्सअॅप मेसेजेस एका वृत्तवाहिनीला मिळाले असून त्यामध्ये या प्रकरणाला नवा ट्वीस्ट देणारे आणि सुब्रह्मण्यम स्वामींचे दावे खरे असल्याकडे इशारा करणारे खुलासे समोर येऊ लागले आहेत. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या खुलाशांमुळे सुशांतला त्याच्याही नकळत ड्रग्ज दिलं जात होतं का? असा संशय आता बळावू लागला आहे.

काय आहे या मेसेजेसमध्ये?

रिया चक्रवर्तीचे जे काही व्हॉट्सअॅप मेसेजेस समोर आले आहेत, त्यामध्ये समोरची व्यक्ती आणि रियामध्ये मरिजुआना अर्थात गांजा आणि MDMA या ड्रग्जविषयी बोलत असल्याचं सांगितलं जात आहे. ‘मी आत्तापर्यंत Hard Drugs फार काही घेतलेलं नाही. एकदा MDMA ट्राय केलं होतं’, असा मेसेज रियाने पाठवल्याचं या मेसेजेसवरून दिसत आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरचं एक मेसेजवरचं संभाषण समोर आलं असून त्यात रिया समोरच्या व्यक्तीकडे ड्रग्जची मागणी करत असल्याचं दिसत आहे. ‘तुझ्याकडे MD (ड्रग्जचा एक प्रकार) आहे का?’ असा मेसेज रियाने Gaurav Arya नावाच्या एका व्यक्तीला पाठवला होता. त्यानंतर Jaya Saha नावाच्या व्यक्तीने रियाला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे, ‘४ थेंब कॉफी, पाणी किंवा चहात टाक. त्याला पिऊ दे. ३० ते ४० मिनिटात त्याला किक बसेल’.

दरम्यान, हे मेसेजेस समोर आल्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांच्या वकिलांनी त्यासंदर्भात गंभीर आरोप केला आहे. ‘सुशांतला त्याच्याही नकळत ड्रग्ज दिलं जात होतं. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आमच्या FIR मध्ये आम्ही म्हटलं होतं की सुशांतला अति औषधं देण्यात आली आहेत. आम्हाला वाटत होतं की हे त्याच्यावर ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांनी किंवा मानसोपचार तज्ज्ञांनी दिलं असावं. पण रियाच्या मेसेजेसमधून झालेला हा नवा खुलासा गंभीर आणि स्फोटक आहे. कदाचित त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला हे हार्ड ड्रग्ज दिले गेले असावेत’, असा आरोप वकील विकास सिंह यांनी केला आहे.


Sushant Singh Death: प्रकरणात ‘सायकोलॉजिकल ऑटोप्सी’ होणार; जाणून घ्या काय आहे प्रकार
First Published on: August 26, 2020 1:41 PM
Exit mobile version