घरताज्या घडामोडीSushant Singh Death: प्रकरणात 'सायकोलॉजिकल ऑटोप्सी' होणार; जाणून घ्या काय आहे प्रकार

Sushant Singh Death: प्रकरणात ‘सायकोलॉजिकल ऑटोप्सी’ होणार; जाणून घ्या काय आहे प्रकार

Subscribe

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय सध्या वेगात करत आहे. या तपासा दरम्यान जेव्हापासून ‘सायकोलॉजिकल ऑटोप्सी’ नावाचा शब्द समोर आला आहे तेव्हापासून बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ते जाणून घ्या.

आज तक वृत्तानुसार, ‘सायकोलॉजिकल ऑटोप्सी’चा अर्थ मेंदूचे पोस्टमॉर्टम आहे. जेव्हा आत्महत्या म्हणून या प्रकरणाकडे पाहिले जाते तेव्हाच ‘सायकोलॉजिकल ऑटोप्सी’ केले जाते.

- Advertisement -

जेव्हा पोलीस आणि सीबीआय ‘सायकोलॉजिकल ऑटोप्सी’ करतात तेव्हा ते ही आत्महत्या आहे की नाही ते पाहतात. जर असेल तर यावेळी त्याची मानसिक स्थिती काय होती? तसेच आत्महत्येपूर्वी १० दिवस आधी त्याच्या वागण्यात काय बदल झाले होते? जसे की तो इतर व्यक्तीशी कशाप्रकारे बोलायचा, हरविल्यासारखा राहायचा की नाही? सामान्यः मित्रांसोबत तो जितका बोलतो तितका बोलायचा की नाही? वेळेवर जेवत होता की नाही? व्यवस्थित झोपतो होता की नाही? तसेच त्याच्या आत्महत्यापूर्वी काही बदल झाले का? या बदलांचा परिणाम मोठा झालाय का? अशा प्रकारच्या गोष्टी ‘सायकोलॉजिकल ऑटोप्सी’मध्ये पाहिल्या जातात. सुनंदा पुष्कर प्रकरणात असा प्रकार केला आहे. त्यामुळे सध्या सुशांतच्या प्रकरणात देखील ‘सायकोलॉजिकल ऑटोप्सी’ करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – Sushant Suicide Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी CBIशी बोलला खोटं!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -