गझलकार पंकज उदास यांचे मराठीत भावगीताने पदार्पण

गझलकार पंकज उदास यांचे मराठीत भावगीताने पदार्पण

संगीतप्रेमींना या विविध वैशिष्ट्यपूर्ण संगीतप्रकाराचा आनंद घेता यावा यासाठी गायिका अनुराधा पौडवाल यांच्या कन्या कविता पौडवाल ‘रंग धनूचा झुला’ हे भावगीत सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गझल गायक पंकज उदास यांच्यासोबत त्यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच्या निमित्ताने पंकज उदास हे प्रथमच मराठी रचना सादर करणार आहेत.‘रंग धनुचा झुला’ या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिले असून गीतकार मंदार चोळकर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे.

‘रजनीगंधा जीवनी या’ यासारख्या अनेक भावगीतांचे संगीतकार दिवंगत अरूण पौडवाल यांचा प्रभाव असलेल्या आणि अशोक पत्की व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतापासून प्रेरणा घेत कविता पौडवाल यांनीही आता भावगीत गायनाकडे आपला ओढा वळवला आहे. “पंकज उदास यांच्यासोबत मराठी भावगीत सादर करावे ही माझ्या आईची म्हणजे अनुराधा पौडवाल यांची इच्छा होती. कारण मराठी भावगीतासाठी त्यांची गायन शैली अत्यंत साजेशी आहे. ते जगभरात लोकप्रिय आहेत आणि त्यांचे संगीत चिरंतन टिकणारे आहे. हे सगळे घटक आणि अशोक पत्की यांच्या अवीट गोडीच्या संगीतरचनेची सांगड घालत आम्ही पारंपरिक संगीत आणि समकालीन बाज यांचा संयोग या निमित्ताने घडवून आणला आहे. ‘चिठ्ठी आई है’सारखी त्यांची गाणी अत्यंत लोकप्रिय होती आणि त्यांची गायनशैली भावगीत या प्रकाराला साजेशी आहे.”,असे कविता पौडवाल यांनी सांगितले.

“मी महाराष्ट्रात मुंबईत राहून देखील एवढी वर्ष कधीच मराठी गाण गायलं नाही. माझ्या तीन दशकांच्या सांगीतिक कारकिर्दीत मी सर्व भाषेत गाणी गायली आहेत. पण प्रथमच मी मराठी गाणं गात आहे. कविता आणि अशोक पत्की यांच्या समवेत हे अत्यंत मधुर गीता गाताना मला खूप समाधान लाभले. गीतकार मंदार चोळकर यांनी अतिशय सुंदर शब्दात हे गाण लिहिले आहे. जगभरातील संगीत चाहत्यांना हे गाणे आवडेल.”
– प्रसिद्ध गझलकार पंकज उदास

या गाण्यांसाठी ध्वनीचा बाज आधुनिक आहे आणि त्याचा गोडवा पारंपरिक आहे. त्यामुळे हे गाणं ऐकायला अत्यंत मधुर आहेत. पंकज उदास यांच्या आवाजामुळे श्रोत्यांनाही भावगीताचा पैलू जाणवेल. सहजसुंदर रचना करण्यात अशोक पत्की यांचा हातखंडा आहे. त्यामुळे ही गाणी श्रोत्यांना निश्चित आवडतील.


१०० व्या अ.भा. नाट्य संमेलनाध्यक्षपदी जब्बार पटेल

First Published on: November 21, 2019 1:18 PM
Exit mobile version