सलमान खानच्या घरात बॉम्ब?

सलमान खानच्या घरात बॉम्ब?

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान

अभिनेता सलमान खानच्या घरात बॉम्ब ठेवण्यात आला आहे. आता पुढच्या दोन तासांत स्फोट होणार आहे. असा ई-मेल मुंबई पोलिसांना आल्याने काही काळ सगळ्यांनाच धक्का बसला. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात काहीच तथ्य न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. संबंधित ई-मेल करणारा १६ वर्षीय मुलगा गाझियाबादचा असून त्याला ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले आहे.

वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये ४ डिसेंबरला हा मेल आला होता. ‘सलमान खानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. दोन तासांत या बॉम्बचा स्फोट होणार आहे…रोक सके तो रोक लो’ अशी धमकी त्या मेलमध्ये देण्यात आली होती. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बाँब शोधक व नाशक पथकासह तातडीने सलमानच्या निवासस्थानी दाखल झाले.

पोलिस पोलीस सलमानच्या घरी गेले तेव्हा सलमान घरी नव्हता. सलमानचे वडील सलीम खान, आई सलमा खान आणि बहिण अर्पिता घरात होती. त्यांना पोलिसांनी या ई-मेलबाबत कल्पना दिली. त्यानंतर जवळपास चार तास पोलिसांनी सलमानच्या घरासह इमारतीचा कोपरान् कोपरा चाळला. मात्र, त्यात काहीच संशयास्पद वस्तू आढळली नाही. शोधमोहीमेनंतर सलमानच्या कुटुंबीयांना घरात पाठवण्यात आले.

यानंतर पोलिसांनी पोलिसांनी ई-मेल करणाऱ्याचा शोध सुरू केला. ई-मेल करणारा मुलगा अल्पवयीन असल्याचे व तो गाझियाबादमध्ये राहणारा असल्याचे समोर आले. पोलिसांनी घडलेला संपूर्ण प्रकार सदर मुलाच्या भावाला सांगितला. त्यानंतर या मुलाला अटक करून पोलिसांनी मुंबईतील बाल न्यायालयात हजर केले असता त्याला समज देऊन सोडण्यात आले आहे.

First Published on: December 15, 2019 9:16 AM
Exit mobile version