गिऱ्हण : अंधश्रद्धेच्या सावटाखालील ग्रामीण समाजाचं चित्रण

गिऱ्हण : अंधश्रद्धेच्या सावटाखालील ग्रामीण समाजाचं चित्रण

भारतात अजूनही ग्रहाणाला खुप महत्त्व दिले जाते. 21 व्या शतकातही लोक ग्रहण पाळतात. गर्भवती महिलेला ग्रहानात उपाशीपोटी राहून दिवसभर एका अंधाऱ्या खोलीत बसून राहावे लागते जेणेकरून तीच्यावर सूर्य किरणे पडणार नाही. ग्रहानात काही भाजी चिरली किवा किवा मांडी घालून बसले तर होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होतो आणि गिऱ्हण ही अशीच एका अंधश्रद्धाळू कुटुंबाची कथा आहे, ज्या कुटुंबात बुवाबाजी, अंधश्रध्दा, ग्रहण म्हणजे देविचा कोप असे मानले जाते.

या लघुपटाच्या कथेमध्ये फुला ही गर्भवती असते बाळू हा तीचा नवरा आहे त्यांना या आधी दोन मुली आहेत आणि या वेळेला मुलगाच होणार आहे असे त्यांना एका बुवाने सांगितलेले आहे. घरात बाळू ची आई देखिल रहते. एके दिवशी अचाणक ग्रहनात फुलाला प्रसव वेदना चालू होतात अशा वेळी ग्रहानात बाळू फुलला दवाखान्यात घेऊन जातो का? की घरातच तिची प्रसुती होते की अजून काही अडथळे येतात हे या गिऱ्हण लघुपटा मधे दाखवलेले आहे. या लघुपटामध्ये स्वाती भादवे,अजित बर्डे,सुलक्षणा पाटील,शंकर बर्डे, शिवन्या बर्डे, आराध्या बर्डे, सचिन जाधव हे कलाकार दिसून येतील. या लघुपटाची निर्मीती सोमनाथ विजय थेटे यांनी केली असून गणेश रामनाथ वैद्य यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच या लघुपटाचे लेखन विशाल बर्डे यांनी केले आहे. छायाचित्रण विक्रांत आवारे आणि संकलन कुमार मेढे यांनी केले आहे.

लघुपटाने पटकावले हे अवॉर्ड्स

1) Darbhanga international Film Festival 2023, Darbhanga(Bihar)- official selection
2) Sittannavasal International Film Festival 2022, Tamilnadu- best short film award
3) Indo French international Film Festival 2023, Pondicherry- Best short film award
4) Make me laugh film Festival 2023, Poland- official selection
5) Devgiri short film Festival 2023, Jalgaon- official selection
6) Flowers against bullets international Film Festival 2023, Austria- official selection


हेही वाचा :

आज सूर्यगड पॅलेसमध्ये रंगणार कियारा सिध्दार्थचा शाही विवाहसोहळा

First Published on: February 7, 2023 11:18 AM
Exit mobile version