घरमनोरंजनआज सूर्यगड पॅलेसमध्ये रंगणार कियारा सिध्दार्थचा शाही विवाहसोहळा

आज सूर्यगड पॅलेसमध्ये रंगणार कियारा सिध्दार्थचा शाही विवाहसोहळा

Subscribe

अखेर आज (7 फेब्रुवारी) ही जोडी कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत शाही पद्धतीने लग्न करतील.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या लग्नाची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.  लग्नाची जोरदार तयारी केल्यानंतर अखेर आज (7 फेब्रुवारी) ही जोडी कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत शाही पद्धतीने लग्न करतील. त्यांच्या लग्नाला 100 ते 125 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये बॉलिवूडच्या काही कलाकारांच्या नावाचाही समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियाराचा मेहंदी समारंभ परवा संध्याकाळी पार पडला असून काल सकाळी त्यांचा हळदी समारंभ पार पडला. तसेच काल संध्याकाळी त्यांचे संगीत देखील झाले. आज (7 फेब्रुवारी) रोजी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थ हळदी, मेहेंदी आणि संगीताच्या विधीनंतर 6 फेब्रुवारीला सात फेरे घेतील. असं म्हटलं जात होतं मात्र, आता काल लग्नाची खरी तारीख समोर आली.

- Advertisement -

राजस्थानातील सूर्यगड पॅलेसमध्ये पार पडणार सोहळा

 

- Advertisement -

 

कियारा आणि सिद्धार्थ राजस्थानातील सूर्यगड पॅलेसमध्ये शाही पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. हा महाल वाळवंटातील किल्ल्यासारखा आहे. या वाड्यामध्ये सुमारे 80 खोल्या पाहुण्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. तर हॉटेलमध्ये सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था आहे. त्याचबरोबर पाहुण्यांसाठी 70 हून अधिक वाहनेही बुक करण्यात आली आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज, जग्वार आणि बीएमडब्ल्यू सारख्या वाहनांचा समावेश आहे.

गुलाबी रंगात रंगला सूर्यगड पॅलेस

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी सूर्यगड पॅलेसमध्ये सजावट करण्यात आली आहे. गुलाबी रंगात सूर्यगड पॅलेस सजवण्यात आला आहे. शिवाय फुलांनी वाड्याची सजावट करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जुळलं प्रेम

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सिद्धार्थ आणि कियारा यांची जोडी शेरशाह या ऑनस्क्रीन चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला, पण पापाराझींच्या कॅमेऱ्यात दोघांचं नातं त्यांच्या चाहत्यांसमोर उघडपणे समोर आलं. सध्या या जोडप्याने त्यांचे नाते अधिकृत केले आहे. दोघांची जोडी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. अनेक पार्ट्यांमध्येही कपल एकत्र दिसत आहे.


हेही वाचा :

ही आहे राखी सावंतची सवत, आदिलसोबत फोटो व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -