तनुश्री दत्ताच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

तनुश्री दत्ताच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

सौजन्य-युट्यूब/NewsMo

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकरांचं प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे. २००८ साली तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन सध्या बॉलीवूडमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगतो आहे. अशातच आता तनुश्रीचा ८ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ एक सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक तनुश्रीच्या गाडीची तोडफोड करताना दिसत आहेत. तनुश्री आपल्या गाडीच्या पाठच्या सीटवर बसून कुणाशीतरी फोनवर बोलते आहे आणि तिच्या गाडीला माध्यकर्मींनी तसंच अन्य काही लोकांनी घेरलं आहे. जमावापैकी काही लोक तनुश्रीच्या गाडीवर चढून तिच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एक व्यक्ती चक्क तिच्या गाडीच्या टायरची हवा काढतो आहे. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्याठिकाणी पोहचून तनुश्रीला तिथून सुखरुप बाहेर काढल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या तनुश्रीची कॉन्ट्रव्हर्सी ताजी असताना या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे विविध चर्चांना आता उधाण आले आहे.

व्हिडिओ सौजन्य- NewsMo

तनुश्रीचा आरोप काय? 

वर्षांपूर्वी आलेला हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एक गाण्याच्या शूटींग दरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला होता. तसंच त्यावेळी मनसेने आपल्याला धमकावल्याचेही तनुश्रीने सांगितलं होतं. राजकीय पक्षाच्या लोकांनी नानाच्या सांगण्यावरू माझ्या गाडीची मोडतोड केली होती असा आरोपही तनुश्रीने केला होता. आता या गाडीच्या तोडफोडीच्या हा व्हिडिओ आणि तिने केलेला आरोप यात खरंच काही तथ्य आहे का? हे येणारी वेळच सांगेल.


वाचा: तनुश्रीच्या आरोपांवर नाना पाटेकरांचं उत्तर
वाचा: तनुश्री PSYCHO; पब्लिसिटीसाठी नानावर आरोप – राखी सावंत

First Published on: October 1, 2018 2:41 PM
Exit mobile version