घरमनोरंजनतनुश्री PSYCHO; पब्लिसिटीसाठी नानावर आरोप - राखी सावंत

तनुश्री PSYCHO; पब्लिसिटीसाठी नानावर आरोप – राखी सावंत

Subscribe

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादात आता राखी सावंतने उडी घेतली आहे. पत्रकार परिषद घेऊन राखीने तनुश्रीच्या आरोपांना खोट म्हटलं आहे. राखीने संताप व्यक्त करता तनुश्रीला सडेतोड उत्तर दिली आहेत.

तनुश्री दत्ता खोटं बोलतेय, केवळ पब्लिसिटीसाठी ती नानावर आरोप करतेय, तिच्या बोलण्यात काहीच तथ्य नाही, ती सायको आहे, असा घखाघाती आरोप डान्सर, अभिनेत्री राखी सावंतने केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील ज्या गाण्याच्या चित्रीकरणावरून हे वादंग उठल त्या गाण्यावर अखेर राखी सावंतने नृत्य केलं होतं. आपण तनुश्रीला रिप्लेस केलं, याचा राग तनुश्रीला असल्याचे राखीने म्हटले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तनुश्री विरूद्ध नाना असा वाद मीडिया आणि बॉलीवूडमध्ये रंगत आहे. त्यावर मौन सोडत आता राखीने उडी घेतली आहे. राखी सावंतने पत्रकार परिषद घेऊन तनुश्रीला खुल आव्हान दिलं आहे.

काय म्हणाली राखी

त्या वादग्रस्त ठरलेल्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी रात्री २ वाजता मला नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांचा फोन आला. त्यांनी मला तातडीने शूटींगसाठी बोलवले. तू शूटींगला आली नाही तर निर्मात्याच खुप नुकसान होईल तो आत्महत्या करेल. तू धावत ये, अस मास्टरजी गणेश आचार्य म्हणाले. मला १०४ ताप होता. तरी मी तिथे गेले. गेल्यावर समजल की, तनुश्रीने स्वतःला वॅनिटी व्हॅनमध्ये कोंडून घेतले होते. काही नशात्मक पदार्थ तिने घेतले आणि कित्येक तास दारच उघडले नाही. अखेर ते गाणं माझ्यावर चित्रीत झालं.

- Advertisement -

वाचा : बॉलीवूड कलाकारांनी तनुश्रीला पाठिंबा दर्शवला

आज दहा वर्षांनी तिला जाग आली. ती इतक्या मोठ्या कलाकारावर आरोप करते. मनसेवर, राज ठाकरेंवर आरोप करते. ती खोटं बोलतेय. माझं चॅलेज आहे तिला. याबाबत एकजरी पुरावा तनुश्रीने दिला तर मी देश सोडून जाईन. तिच्या आरोपांना नाना उत्तर देणार नाहीत. म्हणून मी समोर येतेय. तनुश्रीला बिग बॉसमध्ये जायचे होते. केवळ पब्लिसिटीसाठी ती नानाजींवर आरोप करतेय.

- Advertisement -

ही मराठी मुलगी तुला सोडणार नाही

अग वेडे आमच्या मराठ्यांना तू इथे येऊन शिव्या देणार. नानाजींनी तुला सोडलं, मनसेने तुला सोडलं, राज ठाकरेजींनी सोडलं… राखी सावंत तुला सोडणार नाही. तुला दाखवणार मराठी मुलगी काय करू शकते. फक्त लोकं बॉलीवूडलाच बदनाम करतात. बी, सी ग्रेड सिनेमांमध्ये अशा गोष्टी घडतात. मी असं नाही म्हणणार की नाही घडतं. पण तू दहा वर्षानंतर तू आलीए. अमेरिकेवरून, तुला कोणी विचारत नाही, तुझाकडे काम नाही, तुझा बँकेत पैसे नाही, तू एक नंबरची भिकारी झाली आहेस, मग तुला वाटलं की अस बोलून कॉन्ट्रव्हर्सी करते, म्हणजे काम भेटेल. अस केलं तर अगं वेडे तुला कोणी काम देईल का. निर्मात्याच नुकसान होऊ नये म्हणून मी हे गाणं केलं. आता जे कलाकार तनुश्रीच्या बाजूने बोलत आहेत, ते तिला पाठींबा देत नसून केवळ तिला सहानुभूती दाखवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -