‘या’ अभिनेत्रीनं लपवून ठेवलं आपण आई झाल्याचं

‘या’ अभिनेत्रीनं लपवून ठेवलं आपण आई झाल्याचं

गुल पनाग (सौजन्य - इन्स्टाग्राम)

आपण आई होणार हे प्रत्येकालाच अगदी जगभर सांगावं वाटत असतं. आई झाल्यावरही ही गोड बातमी आपण जगाबरोबर शेअर करत असतो. मात्र एका अभिनेत्रीच्या बाबतीत अगदी उलट घडलं आहे. सोशल मीडियाच्या या जगात मुलगा होऊन सहा महिने झाले तरीही जगभरात कोणालाही याची साधी चाहुलदेखील लावू न देता ही बातमी लपून राहिली. तुम्ही विचार कराल कोण आहे ही अभिनेत्री? तर ३९ वर्षीय गुल पनागनं सहा महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती आता समोर आली आहे. मात्र फिटनेस फ्रिक गुल पनागच्या सोशल मीडियावरूनदेखील ही बातमी कधी समोर आली नाही याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

अभिनेत्री गुल पनाग

सोशल मीडियापासून ठेवलं मुलाला दूर

गुल पनागनं आपला मुलगा निहाल याला ६ महिन्यापूर्वी जन्म दिला आहे आणि तिनं ही बातमी सर्वांपासून लपवून ठेवली. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण आणि आपला नवरा ऋषी यांनी नेहमीच खासगी गोष्टी जपल्या आहेत. पालक बनणं हा खूपच खास आणि व्यक्तीगत अनुभव असतो आणि हा अनुभव आम्हाला पब्लिक करायचा नव्हता असं गुलनं स्पष्ट केलं आहे. आमचं कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांना निहालबद्दल माहीत होतं. मात्र निहालला आम्ही मुद्दाम सोशल मीडियापासून दूर ठेवलं असंही तिनं सांगितलं आहे.

प्रीमॅच्युर जन्माला आला निहाल

सध्या गुल आणि तिचा नवरा जबाबदारी घ्यायला शिकत आहेत आणि कायम हे असंच शिकत राहू असं गुलनं म्हटलं आहे. गुल पुन्हा आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला लागली आहे. पण निहाल प्रीमॅच्युर बेबी म्हणून जन्माला आल्यामुळं आपलं वजन वाढलं नसल्याचं तिनं सांगितलं आहे.

‘डोर’ चित्रपटातून मिळाली ओळख

गुल पनागनं १९९९ मध्ये मिस इंडिया पुरस्कार मिळवला आणि त्यानंतर २००३ मध्ये तिचा पहिला चित्रपट ‘धूप’ प्रदर्शित झाला. मात्र ‘डोर’ या चित्रपटानं तिला खरी ओळख मिळवून दिली. चित्रपट केल्यानंतर पायलटचं शिक्षण पूर्ण करून तिनं लग्न करून पायलट ही पदवीदेखील मिळवली आहे.

First Published on: August 2, 2018 5:40 PM
Exit mobile version