हमारी परमनंट बुकिंग हो गई… लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराचं ट्विट चर्चेत

हमारी परमनंट बुकिंग हो गई… लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराचं ट्विट चर्चेत

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा काल (7 फेब्रुवारी) अखेर विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियाराचा मेहंदी समारंभ 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पार पडला होता. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचा हळदी समारंभ पार पडला. तसेच परवा संध्याकाळी त्यांचे संगीत देखील झाले. काल (7 फेब्रुवारी) रोजी यांचा विवाह सोहळा पार पडला.

वर-वधूने पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

काल रात्री उशीरा कियारा-सिद्धार्थने आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी सांगितली. या शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते.कियाराने हलक्या गुलाबी रंगाची डिझायनर घागरा परिधान केला होता. सोबतच हिरव्या रंगाचा डायमन्ड हार घातला होता. तर सिद्धार्थने गोल्डन रंगाची एबरॉटी शेरवानी परिधान केली होती. यावेळी फोटोंसोबत खाली कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, “अब हमारी परमनंट बुकिंग हो गई, आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे.”

शाही थाटात पार पडलं लग्न

सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा-सिद्धार्थचं लग्न पंजाबी पद्धतीने पार पडलं. काल दुपारी 3 वाजता सिद्धार्थची बँड-बाजासोबत शाही पद्धतीने वरात काढण्यात आली यावेळी विन्टेज गाड्या, घोडे आणि ऊंट देखील होते.

 


हेही वाचा :

अडवाणींची लेक आता मल्होत्रांची सून, कियारा आणि सिद्धार्थ अखेर लग्नबंधनात!

First Published on: February 8, 2023 9:38 AM
Exit mobile version