घरमनोरंजनअडवाणींची लेक आता मल्होत्रांची सून, कियारा आणि सिद्धार्थ अखेर लग्नबंधनात!

अडवाणींची लेक आता मल्होत्रांची सून, कियारा आणि सिद्धार्थ अखेर लग्नबंधनात!

Subscribe

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा आज अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानातील जैसमलेर येथील सुर्यागढ पॅलेस मध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या इंनिंगला सुरुवात केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियाराचा मेहंदी समारंभ परवा संध्याकाळी पार पडला असून काल सकाळी त्यांचा हळदी समारंभ पार पडला. तसेच काल संध्याकाळी त्यांचे संगीत देखील झाले. आज (7 फेब्रुवारी) रोजी यांचा विवाह सोहळा पार पडला.

- Advertisement -

सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. कियारा-सिद्धार्थचं लग्न पंजाबी पद्धतीने पार पडलं तर  सिद्धार्थची बँड-बाजासोबत शाही पद्धतीने वरात निघाली. त्याच्या वरातीत विन्टेज गाड्या, घोडे आणि ऊंट होते.

कियारा-सिद्धार्थच्या लग्नात पाहुण्यांसाठी खास सोय करण्यात आली होती. यावेळी सकाळच्या नाश्त्यामध्ये पाहुण्यांना देशी नाश्ता देण्यात आला. जूही चावलाने या नाश्त्याचा आस्वाद घेत एक पोस्ट शेअर केली आहे. जुहीने शेअर केलेल्या फोटोत ताटामध्ये पराठे, गूळ, दही, लस्सी दिसत आहे. हा देशी नाश्ता पाहून जूही चावलाने कौतुक केलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -