Video: नर्गिसच्या आठवणीने संजय दत्त झाला भावूक; केली पोस्ट शेअर

Video: नर्गिसच्या आठवणीने संजय दत्त झाला भावूक; केली पोस्ट शेअर

दिवंगत अभिनेत्री नर्गिस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा लाडका मुलगा संजय दत्त यांनी त्यांनी आठवण काढत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. दिवंगत अभिनेता सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचे पहिले अत्यत अभिनेता संजय दत्त हा बॉलीवूडचा आघाडीचा कलाकार आहे. आज नर्गिस यांची ३९ वी जयंती असून या निमित्ताने संजय यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने नर्गिस यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्तम पत्नी आणि सर्वोत्तम आई असे म्हटले आहे. अखेरला हॅपी बर्थ डे मा, लव्ह यू…, असेही संजय दत्त यांनी नमूद केले आहे. नर्गिस यांचे आपल्या मुलावरील अपार प्रेम सर्वश्रूत आहे. संजय दत्त यांनी सिनेसृष्टीत पदार्पण करताना त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी संजय दत्त २२ वर्षांचे होते.

रॉकीच्या प्रदर्शनापूर्वीच झाले निधन 

मदर इंडिया चित्रपटानंतर सुनील दत्त आणि नर्गिस यांचा विवाह झाला. त्यांना संजय, नम्रता आणि प्रिया हे अपत्य झाले. सर्वात मोठा संजय आईचा खुपच लाडका होता. १९८१ साली संजय दत्तने रॉकी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यावेळी तो २२ वर्षांचा होता. मात्र त्याच काळात नर्गिस या कर्करोगाने त्रस्त होत्या. दरम्यान, रॉकी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांचे मार्च १९८१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर संजय दत्त अनेकदा बिथरल्याचे पाहयला मिळाले आहे. आजही संजय दत्त आपल्या आईच्या आठवणीने भावूक होतो. दरम्यान, नर्गिस यांच्या मुली नम्रता यांनी अभिनेता राजेद्र कुमार यांचा मुलगा अभिनेता कुमार गौरव यांच्याशी विवाह केला असून प्रिया दत्त यांनी वडिलांची राजकीय कारकिर्द सुरू ठेवली आहे.

हेही वाचा –

भारतात तीन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक, पाकिस्तानी दूतावासातच होते नियुक्तीवर!

First Published on: June 1, 2020 12:48 PM
Exit mobile version