कोणी केली पूजा, तर कोणी वाटली मिठाई; बॉलिवूड सेलिब्रिटींचं दिवाळी सेलिब्रेशन

कोणी केली पूजा, तर कोणी वाटली मिठाई; बॉलिवूड सेलिब्रिटींचं दिवाळी सेलिब्रेशन

दिवाळीनिमित्त संपूर्ण देश लख्ख दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे. अनेक जण आनंदाने हा सण साजरा करत आहेत. बॉलिवूडमध्येही मोठ्या उत्साहात आणि आनंदात दिवाळीचं सेलिब्रेशन करण्यात आले. कुठे फटाक्यांचा धुम-धमाका तर कुठे मिठाईचा सुगंध… बॉलीवूड सेलेब्सने देखील दिवाळी सण एका खास पद्धतीने साजरा केला. चाहत्यांकडूनही त्यांनी दिवाळीच्या खास शुभेच्छा देणायात

बिग बींनी दिवाळीनिमित्त चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी दिवाळीनिमित्त चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेली अमिताभ यांची दिवाळी पोस्ट चाहत्यांसाठी खूप स्पेशल आहे. अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर करत चाहत्यांना खास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीदरम्यान आराम करतेय आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट प्रेग्नंट असून लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. यामुळे आलियाने यंदा एकदम आरामात दिवाळीचा सण साजरा केला आहे. आलियाने दिवाळी सेलिब्रेशनचे दोन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. थ्रोबॅक फोटो आणि नवीन फोटो. दोन्ही फोटो शेअर करून आलियाने सांगितले की, तिने गेल्या वर्षी दिवाळी कशी साजरी केली आणि यावेळी ती कशी करत आहे. या वर्षी तुम्ही आलियाचे दिवाळी सेलिब्रेशन पाहिले आहे का?

अक्षय कुमारचे खास दिवाळी सेलिब्रेशन

अक्षय कुमारने दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी पूजा करून हा सण खास बनवला. अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो पत्नी आणि संपूर्ण स्टाफसोबत पूजा करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले – उजेड, रंग आणि त्याच्यापेक्षाही गोड हास्य. वर्षातील माझा सर्वोत्तम दिवस! माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

करण जोहरने जान्हवी, सारासोबत केले दिवाळी सेलिब्रेशन

सारा अली खानने दिवाळीच्या खास दिवशी तिच्या खास लोकांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. साराच्या या स्पेशल दिवाळी पोस्टमध्ये करण जोहर आणि तिच्या खास मैत्रिणी जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे ही दिसत आहे. तिच्या खास लोकांसोबतचे फोटो शेअर करून साराने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रद्धा कपूरचे स्पेशल विश

बॉलिवूडची गॉर्जियस डिवा श्रद्धा कपूरने तिच्या दिवाळी लूकसह चाहत्यांना खास ट्रीट दिली आहे. श्रध्दाने आकर्षक केशरी रंगाच्या लेहेंगा चोहलीतील स्पेशल दिवाळी लूक शेअर केला आहे अभिनेत्रीचा दिवाळी लूक सुपर ग्लॅम आहे. यासह अभिनेत्रीने दिवाळीला खास मागणीही केली आहे. तिने लिहिले की, वर्षातून 3 वेळा दिवाळी का होऊ शकत नाही?

सोनमचा पारंपारिक लूक 

सोनम कपूर बॉलिवूडची फॅशनिस्टा अभिनेत्री आहे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने सोनम मागे कशी राहणार? अभिनेत्रीने तिचा खास व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये सोनम तिच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत आहे. त्याने खास कॅप्शन देऊन चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले – माँ लक्ष्मीचा हात, सरस्वती हात, गणेशाचा निवास आणि माँ दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात प्रकाश येवो. दिवाळीच्या शुभेच्छा.

धक धक गर्ल माधुरीचे खास दिवाळी सेलिब्रेशन

बॉलिवूडची धडधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही दिवाळीनिमित्त सर्वांना मिठाई वाटत, दिवे आणि फुलांची खास आरास करत दिवाळी सेलिब्रेशन केले, यावेळी माधुरीने चाहत्यांनाही खास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.. माधुरीच्या दिवाळी पोस्टसोबतच अभिनेत्रीचा दिवाळी लूकही जबरदस्त स्टनिंग आहे. गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या साडीत माधुरी खूपच सुंदर दिसत आहे.


कॉलेजमधील प्रेम प्रकरण, बंगळुरूत भारतीय पद्धतीने लग्न; ऋषी-अक्षताची लव्हस्टोरी वाचाच

First Published on: October 25, 2022 3:14 PM
Exit mobile version