HBD: वयाच्या अवघ्या चौथ्यावर्षी सचिन पिळगावकरांनी केली सिनेसृष्टीत एंट्री,आजही आहेत सुपरस्टार

HBD: वयाच्या अवघ्या चौथ्यावर्षी सचिन पिळगावकरांनी केली सिनेसृष्टीत एंट्री,आजही आहेत सुपरस्टार

HBD: वयाच्या अवघ्या चौथ्यावर्षी सचिन पिळगावकरांनी केली सिनेसृष्टीत एंट्री,आजही आहेत सुपरस्टार

गेली अनेक दशके मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते सिचन पिळगावकरांची (Sachin Pilgaonkar) गणना आजही दिग्गज कलाकारांच्या यादित केली जाते. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सचिन पिळगावकरांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. फक्त मराठी आणि हिंदी सिनेमांपर्यंत मर्यादित न राहता त्यांनी भोजपुरी सिनेमा आणि अनेक टीव्ही शोमध्येही काम केलं. आजचा दिवस सचिन पिळगावकर यांच्यासाठी खास आहे. आज सचिनजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.(Sachin Pilgaonkar’s Birthday) सचिन यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 रोजी मुंबई (Mumbai) या स्वप्ननगरीत झाला. पण रंजक गोष्ट अशी आहे त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा देखील वाढदिवस आहे. (HBD: Sachin Pilgaonkar’s entry in Cine World at the age of four)

सुप्रिया पिळगावकर (supriya pilgaonkar)आणि सचिन पिळगावकर यांची जोडीने एकत्र काम केलेले प्रत्येक सिनेमा चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले. व त्यांची जोडी मराठी सिनेसृष्टीत हिट जोडी ठरली. त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास सुप्रिया आणि सचिन यांनी 1995 मध्ये लग्नगाठ बांधली. तसेच त्यांच्या वयात तब्बल 10 वर्षाचे अतंर आहे. दोघांना एक मुलगी असून तिचे नाव श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) असे आहे. श्रियाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे.

आजतागयत सचिन पिळगावकर यांनी 65 हून अधीक सिनेमामध्ये काम केलं असून 50 पेक्षा जास्त सिनेमाच दिग्गदर्शन केलं आहे. त्यांना भारताचे तत्कालीन राष्ट्रपतिंच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
सचिन यांनी अनेक हिट सिनेमात काम केलं पण ‘अंखियों के झरोखे से’ आणि ‘नदिया के पार’ हे सिनेमा त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला कलाटनी देणारा सिनेमा ठरला. सचिन यांचा पहिला – वहिला सिनेमा ‘गीत गाता चल’ हा 1975 साली रिलीज झाला होता. सचिन पिळगावकर यांच प्रवास आजही कायम आहे. अनेक नवशिख्या लोकांसाठी सचिन पिळगावर एक प्रेरणासस्थान आहेत.


हे हि वाचा- ‘जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू’, अफगाणिस्तान-तालिबान संघर्षावर कंगनाची प्रतिक्रिया

First Published on: August 17, 2021 11:17 AM
Exit mobile version