आई-बाबांच्या प्रायव्हसीवर बोलली हेमांगी कवी, म्हणाली…

आई-बाबांच्या प्रायव्हसीवर बोलली हेमांगी कवी, म्हणाली…

हेमांगी नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. त्याचसोबत सोशल मीडियात ही ती खुलेपणाने एखाद्या मुद्द्यावरुन खुलेपणाने बोलताना दिसते. अशातच आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली असून तिने आई-बाबांच्या प्रायव्हेसीवर एक बोल्ड विधान केले आहे.

नुकत्याच हेमांगीने प्लॅनेट मराठीवरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये तिच्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या केल्या. त्याबद्दल बोलताना हेमांगीने असे म्हटले की, मी १८० च्या खोलीत रहायची. तर आई ही केवळ सातवी शिकली होती आणि वडिल एलएलबी झाले होते. आमच्या घरात मोकळीता होती. तर हॉलिवूड मधील टायटानिक सिनेमा असो किंवा हिंदीतील स्टार कास्ट असलेला दयावान सारखे सिनेमे ही घरात आम्ही संपूर्ण परिवराने एकत्रित बसून पाहिले.

बहुतांश वेळेस असे होते की, एखाद्या सिनेमात किंसिंग सीन आल्यानंतर रिमोटची शोधाशोध केली जाते. परंतु आमच्या घरी तसे काहीही व्हायचे नाही. आम्ही तो सीन पहायचो. त्याचसोबत घरातल्यांनी सुद्धा असे सीन पाहण्यासाठी नकार दिला नाही किंवा हे सीन पाहू नका असे कधीच बोलले नाही. परंतु या गोष्टी माझ्या मैत्रीणींच्या घरात लपवल्या जायच्या हे माहिती नसल्याचे हेमांगीने म्हटले आहे. ही गोष्ट जवळजवळ ९३-९४ च्या काळातील असावी असे ही कवीने म्हटले.

आई-बाबांच्या प्रायव्हेसीवरुन बोलताना कवीने असे म्हटले की, आम्ही सर्वजण १८० च्या खोलीतच रहायचो. आई-बाबांची प्रायव्हसी आम्ही पाहिली आहे. जेव्हा पहिल्यांदा मी ते पाहिले तेव्हा त्याबद्दल ताईला विचारले होते. तेव्हा तिने हे असंच असत आणि याच गोष्टीमुळे आपला जन्म होतो असे उत्तर दिले होते. आपल्याला सर्व गोष्टी माहिती असतात, पाहिलेल्या असतात आणि ते केल्यामुळेच आमचा जन्म झाला आहे. आम्ही जगात आलो आहोत याची समज यायली हवी असे ही कवीने म्हटले आहे.

याआधी कवीने ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन सुद्धा तिला जाब विचारला गेला होता. त्या प्रश्नाला जवळपास दोन वर्षानंतर तिने स्पष्टपणे उत्तर दिले होते.

 


हेही वाचा: स्टेडियममध्ये सारासोबत दिसलेला ‘तो’ तरुण नक्की कोण?

First Published on: April 18, 2023 1:20 PM
Exit mobile version