आयुष्यात पहिल्यांदा Pizza खाल्ला… हेमांगी कवीने सांगितला ‘व्हॅलेंटाइन डे’चा किस्सा

आयुष्यात पहिल्यांदा Pizza खाल्ला… हेमांगी कवीने सांगितला ‘व्हॅलेंटाइन डे’चा किस्सा

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमी तिचे चित्रपट, मालिकांसोबत सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. हेमांगी सोशल मीडियावरुन तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करत असते. आज व्हॅलेंटाइन दिनानिमित्त देखील हेमांगी खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिच्या हातातील अंगठीचा आणि पतीचा फोटो शेअर केला आहे. शिवाय यामध्ये तिने तिच्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या आहेत.

हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

आज व्हॅलेंटाइन दिनानिमित्त देखील हेमांगी खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिच्या हातातील अंगठीचा आणि पतीचा फोटो शेअर केला आहे. खाली कॅप्शनमध्ये हेमांगीने लिहिलंय की, “हे माझं पहीलं Valentine gift. १४ फेब्रुवारी २००७! मुलुंडच्या Pizza Hut मध्ये साजरा केला होता पहीला वहीला valentine day. आयुष्यात पहील्यांदा Pizza खाल्ला होता… नाही…त्याने खाऊ घातला होता. हीच माझी त्यादिवशीची propose ring होती आणि पुढे जाऊन हीच माझी engagement ring ही झाली.

खरंतर Propose तर करून झालं होतं. मी हो ही म्हणून झालं होतं. पण लग्नाच्या आधी साखरपुडा करायचाच असतो म्हणून लग्नाच्या काही तासांपुर्वी साखरपुड्याचे कपडे घालून एकमेकांना अंगठी घालण्याची विधीपुर्वक औपचारिक्ता पार पाडली. पण साखरपुड्याची अंगठी म्हणून मी हीच घालणार हे आधीच सांगितलं होतं. कशाला हवी उगाच दुसरी अंगठी! (अशी समजूतदार बायको मिळायला भाग्यच लागतं हो )

तेव्हा बोटात असलेली तीच अंगठी काढून एका नव्या feeling सह माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पुन्हा माझ्या बोटात घातली. मी त्याला त्याच्यासाठी बनवलेली अंगठी घातली आणि झाला आमचा साखरपुडा!
तेव्हापासून आजतागायत ही माझ्या बोटात आहे. आम्ही एकमेकांना उगाचच काहीही gift करत नाही कामाच्याच गोष्टी gift करतो. दिवस ही साजरा होतो. गरज ही भागते आणि आठवण ही राहते.

आजही आम्ही असच काहीतरी खरेदी करणार आहोत. तुम्हीही करा!
Happy Valentine’s Day from us to you!
प्रेम दिनाच्या सर्वांना प्रेममय शुभेच्छा! असं हेमांगीने लिहिलं आहे.


हेही वाचा :

‘व्हॅलंटाईन डे’ च्या निमित्ताने “उर्मी” चित्रपटाचे पोस्टर लाँच

First Published on: February 14, 2023 3:56 PM
Exit mobile version