ही आहे राखी सावंतची सवत, आदिलसोबत फोटो व्हायरल

ही आहे राखी सावंतची सवत, आदिलसोबत फोटो व्हायरल

ड्रामा क्वीन राखी सावंत मागील अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखीच्या आईचे निधन झाले. त्या दुःखातून बाहेर पडेपर्यंत राखीच्या आयुष्यात पुन्हा एक दुःखाचा डोंगर कोसळला. राखीचा पती आदिल खान दुर्रानीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप राखीने केला तसेच आता तिचे लग्न धोक्यात असल्याचे देखील ती सतत सांगत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आदिलची गर्लफ्रेंड असल्याचं राखीने मीडियासमोर सांगितले होते.

कोण आहे राखीची सवत?

कधी सुरु झालं हे प्रकरण?
राखी मराठी बिग बॉसमध्ये गेल्यानंतर दोघांचं अफेअर सुरु झालं. ज्यावेळी राखी बिग बॉसमधून बाहेर पडली त्यावेळी तिला त्यांच्या अफेअरबद्दल समजलं. त्यावेळी राखीची आईदेखील आजारी होती त्यामुळे राखी खूप तणावाखाली वावरत होती. राखीने आदिलला समजावण्याचा प्रयत्न पण त्याने तिचं काहीही ऐकलं नाही. त्यामुळे आता राखीने त्याचा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल केला आहे.

 


हेही वाचा :

‘पठाण’चा 13वा दिवसही ब्लॉकबस्टर; कमावले ‘इतके’ कोटी

First Published on: February 7, 2023 9:35 AM
Exit mobile version