महेश मांजरेकरांना बेड्या ठोकणार? अटकेपासून संरक्षण देण्यास HC चा नकार

महेश मांजरेकरांना बेड्या ठोकणार? अटकेपासून संरक्षण देण्यास HC चा नकार

महेश मांजरेकरांना HC चा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई नाही

Mahesh Manjrekar : निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मांजरेकरांना अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा या सिनेमात दाखवण्यात आलेला आक्षेपार्य दृश्यांप्रकरणी मांजरेकरांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आणि त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत हाय कोर्टाने महेश मांजेकरांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

अलिकडेच रिलीज झालेल्या नाय वरण भात लोन्चा या सिनेमात अल्पवयीन मुलांच्या आक्षेपार्ह दृश्यांविरोधात माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांजरेकर यांच्याविरोधात कलम 292, कमल 34 तसेच पोस्को कलम 14 आणि IT कलम 67 व 67 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना चौकशी करुन योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पांघरुण सिनेमाच्या निमित्ताने महेश मांजरेकरांशी दिलखुलास गप्पा

हायकोर्टाने महेश मांजरेकरांना कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिल्याने मांजरेकरांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असून या सुनावणीत हायकोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

वरण भात लोन्चा सिनेमावर अनेक स्तरातून टीका करण्यात आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी  सर्वांची माफी मागितली होती. त्याचप्रमाणे सिनेमातील ते आक्षेपार्ह सीन्स तात्काळ काढून टाकण्यात आले होते. सिनेमातील दृश्यांवरुन  कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. सिनेमातील ती आक्षेपार्य दृश्य काढून टाकली असून समाजातील तमाम स्त्री वर्गाचा आम्ही आदर करतो असे महेश मांजरेकरांनी म्हटले होते.


हेही वाचा –  ती आक्षेपार्ह दृष्य सिनेमातून वगळली ; महेश मांजरेकरांची शरणागती

First Published on: February 25, 2022 4:00 PM
Exit mobile version