आमिर-किरण रावच्या घटस्फोटाच्या निर्णयावर हिना खानचा मोठा खुलासा म्हणाली…

आमिर-किरण रावच्या घटस्फोटाच्या निर्णयावर हिना खानचा मोठा खुलासा म्हणाली…

आमिर-किरण रावच्या घटस्फोटाच्या निर्णायावर हिना खानचा मोठा खुलासा म्हणाली...

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता आमिर खान (Aamir Khan)आणि त्याच्या पत्नीने म्हणजेच किरण रावने( Kiran Rao) घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयाने खळबळ उडाली आहे. दोघांनीही नुकतच घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कबूल केलं आहे की आम्ही जरी वेगळे होत असलो तरी अजूनही एक कुटूंब आहोत.(Aamir Khan-Kiran Rao Divorce) दोघांच्याही वेगळं होण्याच्या निर्णयाने चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक कलाकारांना देखील धक्का बसला. याचदरम्यान अभिनेत्री हिना खानने(Hina Khan)तिच्या सोशल मीडिया अकांउटवर आमिरच्या घटस्फोट घेण्याच्या निर्णयासंबधीत एक पोस्ट शेअर केली आहे. हिनाने आमिरच्या निर्णयावर दु:ख व्यक्त करत. एका तूटलेल्या हार्ट एमोजी सोबत पोस्ट शेअर करत लिहलं आहे की, “मी दोघांच्याही निर्णयाचा आदर करते. परंतू काही चांगलं होण्याकरिता वाईट परिस्थीतीतून जावे लागते. मी तुम्हां दोघांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देते. जेव्हा नाटक संपत तेव्हा खऱ्या आयुष्याची सुरूवात होते.”


बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान तसेच किरण राव यांनी आपल्या 15 वर्षाच्या वैवाहीक जिवनामध्ये वेगळे होत असल्याची घोषणा केली. तसेच दोघांनी जॉईंट स्टेटमेंट जाहीर करत त्यांचा मुलगा आजाद राव खान (Aazhad rao khan) याला एकत्र मिळून सांभाळणार अल्याचे म्हंटलं आहे. आमिर खान आणि किरण राव यांचा विवाह 28 डिसेंबर 2005 साली झाला होता. याआधी अभिनेता आमिर खानने रीना दत्ता (Reena Datta)सोबत विवाह केला होता.



हे हि वाचा – Video: घटस्फोट घेतल्यानंतर आमिर, किरणचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांना म्हणाले…



 

First Published on: July 5, 2021 10:09 AM
Exit mobile version