Prithiviraj chauhan Teaser: “हिंदूस्तान का शेर आ रहा है”, अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा टीजर रिलीज

Prithiviraj chauhan Teaser:  “हिंदूस्तान का शेर आ रहा है”, अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा टीजर रिलीज

गेले दीड वर्षे कोरोनाच्या सावटामुळे सिनेमागृहे बंद होती. आता सिनेमागृहे सुरु झाल्यानंतर एकसोएक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आतापर्यंत त्यांचे ‘सूर्यवंशी’ आणि ‘बेलबॉटम’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तर आज यशराज फिल्म्सने ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा टीजर लाँच केला आहे. या चित्रपटात अक्षय पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसणार आहे.पृथ्वीराज चौहान या चित्रपटाच्या टीजरची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होते. रिलीज होताच टीजरला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. टीजरची सुरुवात पृथ्वीराज चौहान यांच्या परिचयाने होते, ज्यामध्ये पृथ्वीराज चौहान किती शूर होते, ज्याच्या मागे १०० सैन्य, १०० सरंजामदार, जो वतन आणि वचनासाठी शिरच्छेद करायला तयार होतो, तो सम्राट म्हणजे पृथ्वीराज चौहान.”हिंदूस्तान का शेर आ रहा है” या डायलॉगने दमदार म्यूझिकसह टीजरची सुरुवात होते.

 

या सर्व डायलॉगच्या मागे युद्धभूमी दाखवली आहे. यासोबतच सोनू सदू, मानुषी, अक्षय आणि संजय दत्त या सर्वांच्या लूकची झलकही पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीतही प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहे.टीजरमधील संजय दत्त आणि सोनू सूदचा दमदार लूकने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त खलनायक ‘मोहम्मद घौरी’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी या चित्रपटातून पदार्पण करणारी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरही तिच्या वेशभूषा आणि राणीच्या भूमिकेत प्रभावी दिसत आहे.


हे ही वाचा – Sooryavanshi : नेटफ्लिक्सने विकत घेतले ‘सूर्यवंशी’चे डिजिटल हक्क


 

First Published on: November 15, 2021 2:13 PM
Exit mobile version