घरमनोरंजनSooryavanshi : नेटफ्लिक्सने विकत घेतले 'सूर्यवंशी'चे डिजिटल हक्क

Sooryavanshi : नेटफ्लिक्सने विकत घेतले ‘सूर्यवंशी’चे डिजिटल हक्क

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ स्टारर सुपरहिट ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे डिजिटल हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. जवळपास १०० कोटी रुपयांना ही डील झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. तर येत्या ५ नोव्हेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

५ नोव्हेंबरला विविध सिनेमागृहांमध्ये रिलीज झालेल्या सूर्यवंशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटींच्या वर गल्ला जमवला आहे. अद्यापही सिनेमागृहांमध्ये सूर्यवंशी पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट रिलीज झाल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी केली आहे. चित्रपटाने रिलीजपासून बॉक्स ऑफिसवर ७ दिवसांत १२० कोटींचा बिझनेस केला. तर ओव्हरसीजमध्ये तब्बल ३७.२२ कोटींची मजल मारली आहे. दरम्यान नेटफ्लिक्सला १०० कोटींना डिजिटल अधिकार विकल्यानंतर सूर्यवंशीने २५० कोटी रुपये कमावले आहेत.

- Advertisement -

अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा हा चित्रपट देशभरात जवळपास ३५०० स्क्रीन्सवर आणि इतर ६६ देशांमध्ये १३०० स्क्रीन्सवर रिलीज झाला. रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबमधून या चित्रपटाला विरोध करण्यात आला, त्यामुळे पंजाबमधील अनेक चित्रपटगृहांतून या चित्रपटाचे स्क्रीनिंग थांबण्यात आले. पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांनी अक्षय कुमारला भाजप समर्थक म्हणत त्याचा पुतळाही जाळला. पहिल्या दिवसानंतर पंजाबच्या कलेक्शनमध्ये घट झाली, तरी गुजरात आणि मुंबईसारख्या अनेक शहरांमध्ये चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -