शाल्मली खोलगडे, सुनिधी चौहान यांनी रचला इतिहास, न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदा झळकल्या भारतीय महिला सिंगर

शाल्मली खोलगडे, सुनिधी चौहान यांनी रचला इतिहास, न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर  पहिल्यांदा झळकल्या भारतीय महिला सिंगर

शाल्मली खोलगडे, सुनिधी चौहान यांनी रचला इतिहास, न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदा झळकल्या भारतीय महिला सिंगर

कलाकारासाठी त्याची कला जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन लोकांपर्यंत पोहचणे. तसेच कलाकाराची त्याच्या कलेच्या जोरावर ओळख निर्माण होणे यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट असूच शकत नाही. मराठमोळी तसेच भारतीय गायिका  सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोघींच्या ‘हियर इज ब्यूटीफुल’ या गाण्याची भुरळ आता परदेशातही पडली आहे. हे गाण लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याची प्रसिद्धी तसेच लोकांची पसंती पाहता न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन स्थित मेन इलिट टाइम्स स्क्वेर बिलबोर्ड वरील स्क्रीन वर शाल्मली आणि सुनिधी यांचे पोस्टर झळकले आहे.

सुनिधी  चौहान आणि शाल्मली खोलगडे यांची जोडी ग्लोब म्यूजिक ”स्पोटिफाई इक्वल” कार्यक्रमात भाग घेणार्‍या एकमात्र गायिका आहेत. ज्या महिला गायकांच्या इक्विटि साठी मागणी करत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर ही मोठी बातमी शेअर करत शाल्मली लिहते की,” आनंद साजरा करण्याची ही वेळ नाही कारण जेव्हा आजूबाजूला बरेच वेदना, नुकसान आणि दु: ख आहे . मी टाइम स्क्वेअर बिलबोर्डवर माझा चेहरा झळकणार असे स्वप्नसुद्धा पाहिले नाही. मी आता इंग्लिश इंडिपेंडेंट म्यूजिकची सुरुवात केली आहे.आणि  पुढे जाण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

तसेच सुनिधी चौहान हिने आपल्या गायकी अंदाजात शाल्मलीला टॅग करत आनंद व्यक्त करत लिहते की, ”ये कहा आ गये हम,युही साथ साथ चलते” दोघांच्या या आंतरराष्ट्रीय कामिगिरीच सर्व स्तरावर कौतुक होत आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


हे हि वाचा – कोलकात्यात ‘मिसेस अंडरकव्हर’ चे कोरोना काळातले शूटिंग, राधिका आपटेने शेअर केला अनुभव !

First Published on: May 3, 2021 11:37 AM
Exit mobile version