Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कोलकात्यात 'मिसेस अंडरकव्हर' चे कोरोना काळातले शूटिंग, राधिका आपटेने शेअर केला अनुभव...

कोलकात्यात ‘मिसेस अंडरकव्हर’ चे कोरोना काळातले शूटिंग, राधिका आपटेने शेअर केला अनुभव !

अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केलं आहे. ती नेहमीच चित्रपटातून चाहत्यांसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. 

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या कठीण काळात अनेक लोकं  जीव मुठीत धरून आपल्या कामकाजासाठी बाहेर पडत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तर आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. अशातच बॉलिवूड मधील अनेक चित्रपटांचे शूटिंग सुद्धा सुरू आहे. अभिनेत्री राधिका आपटेने नुकतीच ‘मिसेस. अंडरकव्हर’ या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे 45 दिवसांचे शेड्युल पूर्ण केले आहे. कोरोना व्हायरसच्या काळातील आरोग्याची गंभीर स्थिती पाहता, राधिकाने योग्य खबरदारी घेऊन चित्रीकरण पूर्ण केलं आहे.राधिकाने स्वत:च याविषयीचा खुलासा केला, ती म्हणाली, “अनुभव काही वेगळा नव्हता, आम्ही वारंवार कोरोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे बरीच सावधानता बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. त्याशिवाय इतर सर्व काही अगदी सारखेच होते.”शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने सर्व आवश्यक ती सावधगिरी बाळगली. हॉटेलपासून ते शूटिंग लोकेशनपर्यंत फक्त तेवढाच आवश्यक प्रवास करण्यात आला असून चित्रिकरणाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

- Advertisement -

राधिका आपटे हि ओटीटी क्वीन म्हणून सुद्धा संबोधली जाते. सध्या राधिका यशाच्या शिखरावर असून अनेक प्रसिद्ध मासिकांच्या कव्हर पेज वर झळकत आहे. तसेच, ‘ओके कॉम्प्यूटर’ या वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयाबद्दल कौतुक झाल्यानंतर राधिका, भविष्यात लवकरच काही प्रमुख चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ‘मिसेस अंडरकव्हर’ आणि काही आगामी प्रोजेक्टचा समावेश आहे. राधिकेने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केलं आहे. ती नेहमीच चित्रपटातून चाहत्यांसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असते.


हे हि वाचा – अभिनेता दिलीप कुमार रुग्णालयात दाखल,पत्नी सायरा बानोने दिली माहिती म्हणाली…

- Advertisement -