तब्येत ठिक नसल्याचे कारण देत हनी सिंगने कोर्टात मारली दांडी

तब्येत ठिक नसल्याचे कारण देत हनी सिंगने कोर्टात मारली दांडी

तब्येत ठिक नसल्याचे कारण देत हनी सिंगने कोर्टात मारली दांडी

बॉलिवूडमधील (bollywood)लोकप्रिय रॅपर हनीसिंग (Yo Yo Honey Singh ) त्याच्या नव्या गाण्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. परंतु सध्या हनीसिंग वेगळ्याच वादात अडकला आहे. हनीसिंगची पत्नी (honey singh wife)शालिनी तलवार(Shalini talwar) हिने घरगुती हिंसाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Yo Yo Honey Singh Domestic Violence Case) शालिनीने हनीसिंगवर शारिरीक हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक हिंसा केल्याचा आरोप लावला आहे. हनीसिंगबाबत शालिनीने खूप मोठे खुलासे केले आहेत आणि त्याच्या कुटुंबियांवर देखील गंभीर आरोप केले असून गुन्हा दाखल केला आहे.(honey singh will not appear in court du to not feeling well)

हनीसिंगवर घरगुती हिंसाचार महिला संरक्षण अधिनियम,2005 अंतर्गत दिल्लीतील तिस हजारी कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. या केस संदर्भात आज ( 28 ऑगस्ट ) सुनावणी होणार आहे. मात्र हनीसिंगची तब्येत ठिक नसल्यामुळे कोर्टात हजर राहू शकत नाही अशी विनंती कोर्टाकडे केली आहे. तसेच पुढील सुनावणीवेळेस दिल्ली कोर्टात नक्की हजर राहणार असा विश्वास देखील दिला आहे. हनी सिंगच्या विनंती नंतर कोर्टाने ‘कोणीही कायद्यापेक्षा वर नाही’ असं म्हणत हनी सिंगला फटकारले आहे. यावर हनी सिंहच्या वकिलांनी न्यायालयाला विश्वास दाखवत हनी सिंह लवकरात लवकर न्यायालयात वैद्यकीय अहवाल आणि आयकर विवरणपत्र सादर करेल, असं म्हटलं. तसेच कोर्टाने पुढील सुनावणी 3 सप्टेंबर 2021 रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

हनीसिंगचे कुटुंब सतत तिला शारिरीक त्रास देत होते, असे तिने सांगितले आहे. शालिनीने म्हणाली की, हनीसिंग आणि त्याच्या कुटुंबाने तिला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या इतके तोडले होते की, तिला एखादे जनावर असल्याचे वाटत होते. तिने तिच्या सासरे म्हणजे हनीसिंगच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.


हे हि वाचा – श्रद्धा कपूर अडकणार विवाहबंधनात?, सोशल मीडियावर श्रद्धाचा ब्रायडल लूक व्हायरल

First Published on: August 28, 2021 2:51 PM
Exit mobile version