घरमनोरंजनश्रद्धा कपूर अडकणार विवाहबंधनात?, सोशल मीडियावर श्रद्धाचा ब्रायडल लूक व्हायरल

श्रद्धा कपूर अडकणार विवाहबंधनात?, सोशल मीडियावर श्रद्धाचा ब्रायडल लूक व्हायरल

Subscribe

श्रद्धाने इस्टाग्रामवर तिचा  ब्रायडल लूकचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये श्रद्धा नववधुप्रमाणे नटली आहे.

 

सिनेसृष्टीतील (bollywood)लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरने(Shraddha kapoor) आपल्या अभिनया सोबतच सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केले आहे. श्रद्धाचा इंडियन लूक असो किंवा हॉट पेहराव चाहते तिची अदा पाहून प्रेमात पडतात असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही. श्रद्धाचे सोशल मीडिया इस्टाग्रामवर(instagram) तब्बल 65 मिलियन फॉलोवर्स असून आपल्या व्यक्तीगत तसेच व्यावसायिक जीवनातील घडामोडी श्रद्धा चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. नुकतच चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते विवाहबंधनात अडकले आहेत. त्याचबरोबर आता कपूर घराण्यातही सनईचौघडे वाजणार असल्याची चर्चा श्रद्धाने केलेल्या एका फोटोशूटवर होत आहे. तसेच श्रद्धा गेल्या काही दिवसांपासून रोहन श्रेष्ठ सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे कळतेय. रोहन आणि श्रद्धाला अनेकदा पार्टी, प्रमोशन इव्हेंटमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.मात्र दोघांनी एकमेकांच्या नात्या बद्दल काही सांगितले नाही. श्रद्धा कपूर आणि रोहित श्रेष्ठ त्यांच्या नात्याबद्दल बोलत नसले तरी, काही दिवसांपासून लग्नाची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. यातच आता रोहन श्रेष्ठच्या वडिलांनी श्रद्धा कपूर आणि रोहित श्रेष्ठ यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना हिंट दिली होती.(Shraddha kapoor bridal look viral)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

- Advertisement -

याचदरम्यान आता श्रद्धाचा ब्रायडल लेहंगा परिधान केलेला एक फोटो तूफान व्हायरल होत आहे.श्रद्धाने इस्टाग्रामवर तिचा  ब्रायडल लूकचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये श्रद्धा नववधुप्रमाणे नटली आहे. यामुळे श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चांना उधान आलं आहे. मात्र, हे फोटोशूट श्रद्धाने पीकॉक इंडिया या ब्रान्डसाठी केलं असून या लाल लेहंग्यामध्ये श्रद्धा अत्यंत सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी श्रद्धाच्या लूकला चांगलीच पसंती दर्शवली आहे तसेच लाईक्स आणि कमेटंचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – सुहाना खानच्या Sheer टॉपची सोशल मीडियावर होतेय चर्चा !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -