मराठी चित्रपट चालणार कसे ? -हेमंत ढोमे

मराठी चित्रपट चालत नाही, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, म्हणून आम्हाला शो रद्द करावा लागतो, अशी अनेकदा थिएटरवाल्यांची तक्रार असते. प्रेक्षक येऊनही जर शो रद्द होत असेल, तर हे चुकीचे आहे. असाच प्रकार घडला आहे, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटाच्या बाबतीत. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याचे अनेकांकडून कौतुक होत असतानाच कल्याणमधील एका थिएटरमध्ये ‘सनी’चे बुकिंग घेऊन, शो रद्द झाल्याचे थिएटरकडून परस्पर कळवण्यात आले. याबाबत प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे थेट हेमंत ढोमेंशी संपर्क साधला. हा संतापजनक प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडला नसून राज्यात अनेक ठिकाणी ‘सनी’चे शोज अचानक रद्द करण्यात आलेत. याबाबत अभिनेता आणि सनी चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्याशी झालेला टेलिफोनिक संवाद या व्हिडीओमध्ये आहे.

#hemantdhome #sunny #marathimovie #interview

First Published on: November 21, 2022 5:48 PM
Exit mobile version