जया बच्चन यांनी पाठवला गाजराचा हलवा, हृषीकेश जोशींनी सांगितला धम्माल किस्सा!

जया बच्चन यांनी पाठवला गाजराचा हलवा, हृषीकेश जोशींनी सांगितला धम्माल किस्सा!

Abhishek Bachchan, Hrushikesh joshi

आर माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रीद’(Breathe) या वेबसिरीजचा पहिला सिझन गाजल्यानंतर आता दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामध्ये अभिषेक बच्चनबरोबर हृषिकेश जोशी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील हृषिकेशच्या कामाचे सर्व प्रेक्षकांनी तसेच जगभरातील समीक्षकांनी खूप कौतुक केले. दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेश म्हणजेच इन्स्पेक्टर प्रकाश अक्षरशः धमाल करणार आहे.

Abhishek, Hrushikesh

दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चन यांच्या बरोबर दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री नित्या मेनन यांची  देखील महत्वाची भूमिका आहे. ‘ब्रीद या वेबसिरीजमध्ये  प्रत्येक सिझनला प्रमुख भूमिकेतील व्यक्तिरेखा बदलत जातात. मात्र ज्या दोन ब्रँड व्यक्तिरेखा प्रत्येक सिझनमध्ये कायम राहणार आहेत त्या म्हणजे हृषिकेश जोशी ( इन्स्पेक्टर प्रकाश ) आणि अमित साध (इन्स्पेक्टर कबीर सावंत) यांच्या व्यक्तिरेखा. ‘ब्रीद -2’ हा सिझन अॅमॅझॉनवर प्राईम वर १० जुलैला प्रदर्शित होत आहे.

पहिल्या सिझनला आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेला जो  प्रतिसाद मिळाला त्यानंतर निर्मात्यांनी मला बोलावून सांगितले की, माझी व्यक्तिरेखा इथून पुढे सर्व सिझनमध्ये कायम राहणार आहे आणि अधिकाधिक महत्वाची होत जाणार आहे आणि त्यानुसार दुसऱ्या सिझन मध्ये माझ्या व्यक्तिरेखेला धरून गोष्ट लिहिली गेली”

“अलीकडे आम्ही सिझन दोनच्या भागांचे डबिंग करत होतो. त्यावेळी मला अभिषेक बच्चन म्हणाले कि, या सिझनमध्ये सर्वाधिक अटेन्शन कोणती व्यक्तिरेखा घेवून जाणार असेल तर ती तुझी. ते म्हणाले कि, तुझे कॅरेक्टर हे या सीजनमधील सरप्राईझ पॅकेज असणार आहे. माझ्यासाठी ही सर्वात मोठी कॉम्प्लीमेंट होती. या सिझनच्या चित्रिकरणादरम्यान माझी आणि अभिषेक बच्चन यांची खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकत्रच जेवायचो, सेटवर खूप क्रिकेट खेळायचो. खूप गप्पा मारायचो. ते खूप गप्पिष्ट आहेत, त्यांना गोड खूप आवडते आणि मलाही. त्यांनी एकदा खास माझ्यासाठी जयाजींनी बनविलेला गाजराचा हलवा आणला होता. त्यांना मराठी कलाकारांबद्दल आणि मराठी रंगभूमीबद्दल प्रचंड आदर आहे,” हृषिकेश सांगतो.


हे ही वाचा – ‘देऊळ बंद २ ..आता परिक्षा देवाची’, तरडेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा!


 

First Published on: July 6, 2020 4:44 PM
Exit mobile version