हृतिक रोशन करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण

हृतिक रोशन करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण

हृतिक रोशन करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु हृतिकने कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कमधील टॅलेंट मॅनेजमेंट गेर्श एजन्सीवर स्वाक्षरी केली आहे. या एजन्सीने क्रिस्टन स्टीवर्ट, जेके सिम्ससन, आणि अॅडन ड्रायव्हर सारख्या सुपरस्टार व्यक्तींचे प्रतिनिधित्व केलं आहे. भारतीय एजन्सी एडब्यूएएन आणि या एजन्सीची मॅनेजर अमृता सेन यांच्याची सहयोग करून हृतिक रोशनने स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता हृतिक रोशन हॉलिवूड चित्रपट करू शकणार आहे.

डेडलाईन या संकेत स्थळाशी बोलताना अमृता सेन म्हणाल्या, ‘गेल्या २० वर्षांपासून हृतिक भारतीय चित्रपटांना नवीन शैली, नवीन कथा, संकल्पना आणि नेहमीत अत्याधुमिक कथा सांगण्यात मदत करत आहे.’ तसंच अमृता पुढे म्हणाला की, ‘हृतिक सध्या नव्या भूमिकेची आणि कथानक करण्याची वाट पाहत आहे.’

२००० मध्ये हृतिकने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. त्यानंतर त्याने ‘फिजा’, ‘मिशन काश्मीर’, ‘कोई मिल गया’, ‘धूम २’, ‘जोधा अकबर’, ‘गुजारिश’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘अग्निपथ’ यासारख्या सुपरहिट चित्रपटात दिसला. २०१९ मधील हृतिकच्या ‘वॉर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता यानंतर हृतिकला बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे.


हेही वाचा – बॉलिवूडचा हा अभिनेता आता विकतोय बुर्जी पाव!


 

First Published on: March 1, 2020 5:35 PM
Exit mobile version