ऋतिक रोशनवर कोसळला दु:खाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

ऋतिक रोशनवर कोसळला दु:खाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ह्रतिक रोशनच्या आजीचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्याची आजी पद्मा राणी ओमप्रकाश यांनी 16 जून रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. पद्मा राणी दीर्घकाळ गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हृतिकची आजी गेल्या अनेक दिवसांपासून होती आजारी

ह्रतिक रोशनची आजी पद्मा राणी ओमप्रकाश बराच वेळ बेडवर होत्या. वाढत्या वयामुळे त्या अनेक आजारांनी त्रस्त होत्या, याच आजारांमुळे काल त्यांचा मृत्यू झाला. पद्मा राणी या चित्रपट निर्माते जे ओम प्रकाश यांच्या पत्नी होत्या. जे ओम प्रकाश यांचे 7 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. ते पिंकी रोशनचे वडील होते. पद्मा राणी ओमप्रकाश गेल्या 2 वर्षांपासून रोशन कुटुंबासोबत राहत होत्या. पिंकी रोशन तिच्या आईचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. फोटोंमध्ये पद्मा राणी ओमप्रकाश अनेकदा बेडवर दिसत होत्या.

हृतिकचे आजोबा कोण होते?

जे ओमप्रकाश यांच्या बद्दल बोलायचे तर ते एक प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक होते. आप की कसम या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. जे ओमप्रकाश यांनी भगवान दादा, आप साथ, आखीर क्यूं?, अर्पण, आस पास, आशा, आशिक हूँ बाहरों का, अपनापन, आस्कर आणि आप की कसम या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. आई मिलन की बेला, आस का पंची, आये दिन बहार के, आंखे आंखे में, आया सावन धूम के यांसारखे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. जे ओमप्रकाश यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.

हृतिक रोशनने 2019 मध्ये आपल्या आजी-आजोबांसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. यावेळी त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझे आजोबा ज्यांना मी प्रेमाने डेडा म्हणायचो, त्यांनी मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिकवलेले धडे, जे मी आता माझ्या मुलांसोबत शेअर करत आहे. लहानपणी माझे स्पीच थेरपिस्ट डॉ. ओझा यांनी मला माझी कमकुवतपणा स्वीकारायला शिकवले आणि स्टॅमरिंगच्या भीतीवर मात करण्यास मदत केली.

हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. यामध्ये फायटर, विक्रम वेध या चित्रपटांचा समावेश आहे. यातील ‘विक्रम वेध’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात सैफ अली खानही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय राधिका आपटे, रोहित सराफ आणि योगिता बिहाणी देखील आहेत. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हृतिकच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे. ह्रतिक सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. हृतिक आणि सबाचे एकत्र फोटो व्हायरल होत आहेत.


एक फ्रेममध्ये तीन पिढ्या; प्रियंका चोप्राने आईसोबत शेअर केला छोट्या राजकुमारीचा फोटो

First Published on: June 17, 2022 11:07 AM
Exit mobile version