हुमा कुरेशीने घेतलाय ‘फुंगसुक वांगडू’चा आदर्श

हुमा कुरेशीने घेतलाय ‘फुंगसुक वांगडू’चा आदर्श

हुमाने घेतला आमीरचा आदर्श

‘सक्सेस के पीछे मत भागो… एक्सलंस का पीछा करो, सक्सेस झक मारके पिछे आएगी’, थ्री इडियटमधील आमीर खानचा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवला असेल. या डायलॉगचा रिअल लाईफ आदर्श हुमा कुरेशीने घेतला आहे. कारण ‘मी यशाच्या मागे धावत नाही, तर मला माझे काम चांगले होणे महत्त्वाचे आहे, असे तिने नुकत्याच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. आता साहजिकच यशापेक्षा ती  तिच्या कामाकडे अधिक लक्ष देत आहे हे मात्र नक्की!

यशामागे धावत नाही!

‘मी यशाचा विचार करत नाही, तर काम चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि त्यालाच महत्त्व देते’, असे तिने सांगितले आहे. ‘माणसाने फक्त काम करावे यशाकडे लक्ष देऊ नये’,असे देखील ती म्हणाली. त्यामुळे हुमाने थ्री इडियटमधल्या फुंगसुक वांगडूचा आदर्श घेतला आहे, असचं काहीसे म्हणावे लागेल.

स्मॉल स्क्रीनवर व्यग्र

हुमा कुरेशी सध्या इंडियाज बेस्ट ड्रामेबाज हा शो जज करत आहे. त्यामुळे तिचा अधिक वेळ या रिअॅलिटी शोच्या सेटवर जातो. याशिवाय तिचे इतर शुट्सही सुरू आहेत. स्मॉल स्क्रीनवर हल्ली सर्रास बॉलीवूड सेलिब्रिटी दिसतात. फक्त फिल्म प्रमोशन नाही तर रिअॅलिटी शो आणि मालिकांमधून देखील  ते काम करतात.  हुमाने स्मॉल स्क्रीनवरील काम कठीण असल्याची कबुली दिली आहे. ती म्हणाली की, मला मिळालेली प्रत्येक संधी मी आव्हान म्हणून स्विकारते. रिअॅलिटी शोच्या सेटवर अनेकदा आले आहे. पण अशा पद्धतीने शो जज करण्याची पहिली वेळ असून लहान मुलांना जज करणे कठीण असल्याचे तिने सांगितले.

हुमा कुरेशी इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या सेटवर (सौजन्य- झी टीव्ही)

हुमा म्हणते, प्रत्येक संधी ही ‘सुवर्ण’ संधी 

हुमाने बऱ्याच उशीरा बॉलीवूडमध्ये कामाला सुरुवात केली असली तरी, तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्यासाठी प्रत्येक संधी सुवर्ण संधी असल्याचे ती म्हणाली आहे. तिने २०१२ साली अनुराग कश्यपच्यागँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमातून कामाला सुरुवात केली. त्यानंतर ‘देढ इश्किया’, ‘बदलापूर’, ‘जॉली एलएलबी २’, ‘काला’ यांसारख्या सिनेमातून तिने दर्जेदार अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

First Published on: July 23, 2018 5:53 PM
Exit mobile version