“तुला लग्नाशिवाय मूल झाल्यास मला काही अडचण नाही,” जया बच्चन नात नव्या नवेलीला म्हणाल्या

“तुला लग्नाशिवाय मूल झाल्यास मला काही अडचण नाही,” जया बच्चन नात नव्या नवेलीला म्हणाल्या

नुकत्याच झालेल्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट शोमध्ये नव्या नवेली नंदा आपल्या आई श्वेता नंदा आणि आजी जया बच्चनसोबत संवाद साधत होती. संवादाचा विषय होता, ‘मॉडर्न लव्ह- रोमान्स अँड रिग्रेट’. या संदर्भात नव्याने जया बच्चन यांना “आजी तुझी प्रेमाची संकल्पना काय ?” असा प्रश्न विचारला असता, जया म्हणाल्या., ” अर्थातच आकर्षण हे खूप महत्वाचं असतं, जर तेच नसेल तर तुम्ही पुढल्या पायरीकडे जाऊ शकणार नाही. सोबतच तुमच्यात समजुतदारपणा आणि चांगलं- वाईट निवडण्याची क्षमता असायला हवी.” पुढे त्या असेही म्हणाल्या की , “… पण एखाद्याचा फक्त हात पकडणे म्हणजे एकत्र सोबत असणे असा होत नाही. ‘सोबत’ म्हणजे खूप काही असतं. नातेसंबंधातील खोली आणि वाचनबद्धता त्यात असते. मला माहित नाही की, आजची पिढी या वाचनबद्धतेसाठी तयार आहे की, नाही?… ”

एकाच घरातील तीन पिढ्यांमधील हा खुला संवाद होता. या संवादात जया म्हणाल्या, “लोकांना माझ्याकडून हे आक्षेपार्ह वाटेल, पण शारीरिक आकर्षण आणि एकमेकांप्रती परिपूरक असणे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या काळात आम्ही याबाबत प्रयोग करू शकलो नाही, पण आजची पिढी करते आहे आणि का करू नये? कारण त्याही गोष्टी दीर्घकाळासाठी कारणीभूत ठरणार आहेत. चिरस्थायी नातं जर कोणतेही शारीरिक संबंध नसतील तर फार काळ टिकणार नाही कारण आपण फक्त प्रेम, ताजी हवा आणि तडजोडीवर ते तरु शकणार नाही असं मला वाटतं.”

या दरम्यान जयांनी श्वेताला सल्ला दिला की , ” मला वाटतं की, तू तुझ्या एखाद्या चांगल्या मित्राशी लग्न करावंसं, तुम्ही चांगले मित्र असला पाहिजे. तू त्याच्यासोबत चर्चा करून ठरवावंसं की, “ओके… कदाचित मला तुझ्यापासून मूल ठेवायला आवडेल, कारण मला तू आवडतोस, मला वाटतं की, तू छान आहेस, म्हणून आपण लग्न करूया कारण समाजाला तसं अभिप्रेत आहे.” पण तुम्हाला लग्नाशिवाय मुल असेल तर मला मात्र काही अडचण नाही, मला खरंच काही अडचण नाही !”

या संवादात जया बच्चन यांनी त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये जमून आलेल्या प्रेमकहाणीच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.


हेही वाचा :

ट्विटरचा मालकी हक्क इलॉन मस्ककडे येताच कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट अ‍ॅक्टिव्ह

First Published on: October 29, 2022 2:58 PM
Exit mobile version