घरमनोरंजनट्विटरचा मालकी हक्क इलॉन मस्ककडे येताच कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट अ‍ॅक्टिव्ह

ट्विटरचा मालकी हक्क इलॉन मस्ककडे येताच कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट अ‍ॅक्टिव्ह

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. अनेकदा कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्रोल देखील केलं जातं. दरम्यान, आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. खरंतर कंगनाचे ट्वीटर परत आली आहे. ज्यामुळे ती अत्यंत खूश आहे. कंगनाने आजच तिचे ट्वीटरवर परत येण्याची आशा व्यक्त केली होती आणि आता अगदी तसंच झालं. कंगनाची भविष्यवाणी खरी ठरली.ज्यामुळे ती खूप आनंदी आहे.

मागील एक वर्षांपासून कंगना तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लोकांशी जोडली गेली आहे. कंगनाच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिचे ट्वीट अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. मात्र, आता ट्वीटरचा मालकी हक्क टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी घेतल्याचे कळताच कंगनाने तिचे ट्वीटर अकाऊंट परत येण्याची आशा व्यक्त केली. तसेच तिने इलॉन मस्क यांचे कौतुक देखील केले. दरम्यान, अशातच कंगनाचे ट्वीटर अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहे.

- Advertisement -

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, “मी नेहमी अशा गोष्टींची भविष्यवाणी करते, ज्या लवकर खऱ्या होणार आहेत. काहीजण माझ्या या दूरदृष्टीला एक्स-रे म्हणतात. तर काहीजण जादूटोणा म्हणतात. आपण कधीपर्यंत अशा प्रकारच्या महिलांच्या प्रतिभेला नाकारणार आहोत. भविष्य सांगणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मानव प्रवृत्तीची उल्लेखनीय ओळख आणि ऑबसर्वेशनल स्किल्स देखील महत्वाची आहे.”

- Advertisement -

कंगना रनौतच्या या स्टोरीवरुन सहज लक्षात येतंय की, कंगना तिच्या ट्वीट अकाऊंटमुळे किती आनंदी आहे. खरंतर, बंगाल विधानसभेतील प्रकरणानंतर कंगनाचे ट्वीटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं होतं.

 


हेही वाचा :

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या अडचणीत वाढ; NCB ने दाखल केले 200 पानी आरोपपत्र

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -