‘मसाबा सारखी मुलगी हवी’ निना गुप्ताला आठवले तरुणीचे शब्द….

‘मसाबा सारखी मुलगी हवी’ निना गुप्ताला आठवले तरुणीचे शब्द….

'मसाबा सारखी मुलगी हवी' निना गुप्ताला आठवले तरुणीचे शब्द....

 

बॉलिवूड अभिनेत्री निना गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या प्रोफेशनल आयुष्यावतिरिक्त खाजगी आयुष्यातील चर्चा जास्त रंगताना दिसतात. निना गुप्ता ही क्रिकेटर विव रिचर्ड याच्या सोबत रिलेशनशिप मध्ये असताना मुलगी मसाबा हीचा जन्म झाला होता. तेव्हा रिचर्ड आणि निनाचे ल्गन देखील झाले नव्हते. त्या वेळेस निनाला घरच्यांकडून पाठबळ मिळाले होते.एका मुलाखती दरम्यान निनाने याबाबत खुलासा केला आहे. मुंबई सारख्या शहरात राहणे सोप्पे नाही मला भरपूर संघर्ष करावा लागला मी जेव्हा मुंबईमध्ये आली त्यावेळेस माझे कुटुंबिय माझ्या करिता खूप काळजी करत असे. इतकेच नाही तर मी कोणत्याही  चुकीच्या  किंवा वाईट गोष्टींचा सामना करावा लागला तेव्हा मी अनेकदा घरच्यांजवळ जाऊन रडत असे दुख: व्यक्त करत असे आणि त्यानंतर सगळ काही ठीक होत असे.

एकदा माझ्या जवळ एक तरुण मुलगी आली आणि म्हणाली मला सुद्धा तुमच्या मसाबा सारखी मुलगी हवी आहे. आणि त्यावेळेस मी तिला म्हणाले तुझी परिस्थिति माझ्या पेक्षा वेगळी आहे. माझ्या आयुष्यात अनेक चढ उतार आले तरी मी माझ्या कुटूबियांकडे येऊन त्यांच्या सोबत आपले दुख: वाटू शकते त्यांच्या मांडीवर डोक ठेवून रडू शकते . माझ्या घरच्यांचा नेहमी मला पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री निना गुप्ता सध्या ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात निना गुप्ता,अर्जुन कपूर ,रकुल प्रीत झळकणार आहेत.


हे हि वाचा – ‘ही’ लोकप्रिय स्टार १९व्या वर्षी बलात्कारानंतर राहिली प्रेग्नेंट; अनेक महिने स्टुडिओतही डांबले होते

First Published on: May 22, 2021 1:11 PM
Exit mobile version