घरताज्या घडामोडी'ही' लोकप्रिय स्टार १९व्या वर्षी बलात्कारानंतर राहिली प्रेग्नेंट; अनेक महिने स्टुडिओतही डांबले...

‘ही’ लोकप्रिय स्टार १९व्या वर्षी बलात्कारानंतर राहिली प्रेग्नेंट; अनेक महिने स्टुडिओतही डांबले होते

Subscribe

प्रत्येक लोकप्रिय स्टारच्यामागे न सांगण्यासारख्या गोष्टी दडलेल्याच असतात. अशीच एक दुःखद बाजू लोकप्रिय पॉपस्टार लेडी गागच्या आयुष्यात घडली आहे. लेडी गागाने आयुष्यातील या कटू सत्याचा खुलासा केला आहे. ओप्रा विंफ्रेच्या शोमध्ये लेडी गागाने तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितले. तिच्यावर १९ वर्षी एका संगीत निर्मात्याने (म्युझिक प्रोड्यूसर) बलात्कार केला होता. ज्यानंतर ती गर्भवती राहिली होती.

लेडी गागाने सांगितले की, ‘मी १९ वर्षांची होती. तेव्हा एका निर्मात्याने मला माझे कपडे काढण्यास सांगितले. मी याला विरोध केला आणि तिथून मी निघून गेली. त्यानंतर त्याने माझे सर्व म्युझिक करिअर उद्धवस्त करून टाकण्याची धमकी दिली. मग मी तिथे थांबले. बलात्काराला वर्ष उलटून गेल्यानंतर शरीरात वेदना होत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गेले. पहिल्यांदा मला खूप वेदना झाल्या त्यानंतर मी सुन्न झाले. मग काही दिवसांसाठी आजारी पडेल. यामध्ये काही आठवडे गेले. त्यानंतर मला समजले की, या अशा वेदना आहेत, जेव्हा एका व्यक्तींने माझ्यावर बलात्कार करून त्याने माझ्या घरात एका कोपऱ्यात मला प्रेग्नेंट सोडून दिले होते. कारण त्यावेळेस मला उलट्या होत होत्या आणि मी आजारी होते. माझे लैगिंक शोषण झाले होते. मला काही महिने स्टुडिओमध्ये लॉक करू ठेवले होते.’

- Advertisement -

पुढे लेडी गागा सांगितले की, ‘मला त्या व्यक्तीला पुन्हा पाहण्याची इच्छा नाही आहे. बलात्कार झाल्यानंतर मी पहिल्यासारखी राहिले नाही. ज्या आघातातून आणि तणावातून मी गेले त्याने मला हादरवले होते. बर्‍याच वर्षांपासून मी मनोविकृत ब्रेकवर होते. यादरम्यान मी अनेक वेळा एमआरआय आणि स्कॅन केले होते, परंतु त्यामध्ये काही मिळाले नाही. पण आपल्या शरीराला सर्व काही लक्षात राहते. मला काही जाणवत नव्हते. जसे की माझे डोके ऑफलाईन गेले होते. त्यानंतर मी सर्व काही हळूहळू विसरून पुन्हा आयुष्याला सुरुवात केली. मी थेरेपी घेतली. अडीच वर्षांच्या या थेरेपी नंतर मी नॉर्मल झाले.’


हेही वाचा – सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या आईचे कोरोनामुळे निधन

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -