इलियाना डिस्क्रूजच्या घरी लवकरच पाळणा हलणार

इलियाना डिस्क्रूजच्या घरी लवकरच पाळणा हलणार

बॉलिवूड मधील अभिनेत्री इलियाना डिस्क्रूज ही गेल्या काही काळापासून रुपेरी पड्यापासून दूर राहत आहे. अशातच ती तिच्या खसागी आणि सोशल मीडियातील पोस्टमुळे मात्र नेहमीच चर्चेत असते. यावेळी सुद्धा असेच काहीसे झाले आहे. अभिनेत्रीने नुकत्याच तिच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावरुन नेटकरी ती प्रेग्नेंट असल्याची जोरदार चर्चा करत आहेत. त्याचसोबत ती आपल्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी खुप आतुर असल्याचे ही दिसून येत आहे.

इलियाने आपल्या इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये एका नव्या बाळाचे स्वागत करणारा बॉडीसूट पोस्ट केला आहे. ज्यावर “And so the adventure begins” असे लिहिले आहे. तर दुसऱ्या फोटोत एक पेंडेंट पहायला मिळाले आहे. ज्यावर “Mama” असे लिहिले आहे. इलियानाच्या या पोस्टनंतर आता नेटकऱ्यांकडून जोरदार चर्चा केली जात आहेच. पण तिला शुभेच्छा ही दिल्या जातायत.

दुसऱ्या बाजूला इलियानाला काही नेटकऱ्यांनी मुलाचे वडिल कोण? तुझे लग्न सुद्धा झाले नाही? असे विविध प्रश्न विचारत आहेत. परंतु या प्रश्नांवर इलियाने मौन धरले आहे. पण तिने नक्की ती प्रेग्नेंट आहे हे तिने सांगितलेले नाही. केवळ नेटकरीच तिच्या या फोटोंवर तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा करत आहेत.

 

——————————————————————————————————हेही वाचा: ॲपलचे CEO टीम कुक यांनी माधुरी दीक्षितसह घेतला मुंबईतील वडापावचा आस्वाद

First Published on: April 18, 2023 3:59 PM
Exit mobile version