अवघ्या 10 दिवसांत ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातून केला 360 कोटींचा टप्पा पार

अवघ्या 10 दिवसांत ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातून केला 360 कोटींचा टप्पा पार

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत कोट्यावधींची कमाई केली असून दिवसेंदिवस ही रक्कम अधिकाधिक वाढत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटावर अनेकजण बहिष्कार टाकण्याची मागणी करत होते. मात्र तरीही यावर कोणताच परिणाम झाला नाही. ‘ब्रह्मास्त्र’ने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकींगद्वारे 36 कोटींची कमाई केली होती.

‘ब्रह्मास्त्र’ 2022 मधील सर्वात भव्य चित्रपट
9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत 200 कोटींचा आकडा पार केला आहे. तसेच संपूर्ण जगभरातून या चित्रपटाने 360 कोटींचा आकडा पार केला आहे. तसेच दुसऱ्या आठवड्याच्या रविवारी चित्रपटाने 17 कोटींची कमाई केली आहे. 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान, दुसऱ्या आठवड्यामध्ये जवळपास 40 कोटींची कमाई केली आहे.

2022 मधील तिसरा सर्वात मोठा चित्रपट
2022 मध्ये आत्तापर्यंत सगळ्यात यशस्वी चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ ज्याने 190 कोटींची कमाई केली होती.

का खास आहे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट?

‘दंगल’ आणि ‘पद्मावत’ला देखील टाकलं मागे
‘ब्रह्मास्त्र’ने बॉलिवूडमधील मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा संजू, टायगर जिंदा है , पद्मावत, धूम 3 , दंगल आणि चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

 


हेही वाचा :

‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरूख खानचा ड्युप्लीकेट पाहिलात का?

First Published on: September 19, 2022 2:18 PM
Exit mobile version