“भारत देश हा फक्त कफ परेड ते अंधेरीदरम्यान”, सलमान खानच्या विधानाने चर्चांना उधाण

“भारत देश हा फक्त कफ परेड ते अंधेरीदरम्यान”, सलमान खानच्या विधानाने चर्चांना उधाण

बॉलिवूडचा ‘दंबग खान’ अभिनेता सलमान खान वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत असतो. चित्रपटांपेक्षा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची माध्यमांमध्ये चर्चा रंगतात. अशातच अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अभिनेता सलमान आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटात झळकणार आहे. सलमान खान त्याच्या स्पष्टवक्तेपणा आणि रागीट स्वभावासाठी ओळखला जातो. अनेकदा त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल आपले स्पष्ट मत मांडलेय, आणि त्याची ही मत अनेकदा वादात देखील सापडली. नुकतचं सलमान खानने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना त्याने, हिंदी सिनेसृष्टीच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले आहे.

सलमान खानला हिंदी सिनेसृष्टीच्या बदलत्या स्वरूपावर प्रश्न विचारण्यात आला होता, यावर उत्तर देताना सलमान म्हणाला की, “ज्यांना भारत देश हा फक्त कफ परेड ते अंधेरदरम्यान आहे असं वाटतं, त्यांनी खरा भारत देश समजून घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत या लोकांना खरा भारत समजणार नाही, तोपर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये खरा भारत देश कसा दिसणार?”

“कफ परेड दक्षिण मुंबईतील एक सुसज्ज ठिकाण आहे. तर अंधेरी आज हिंदी चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र बनलेय” असं विधान सलमान खान याने केले. सलमानचे हेच विधान आता चांगलेच गाजतेय. अनेकजण आता सलमान खानच्या विधानवर उलट सुलट प्रतिक्रिया देत आहे.

यादरम्यान सलमान खानने दाक्षिणात्या सिनेमांच्या ऑफरबाबतही खुलासा केला. सलमान म्हणाला की, “मला दाक्षिणात्य सिनेमा आवडत असले तरी मला अद्याप कोणताही ऑफर आलेली नाही. अनेक निर्माते, दिग्दर्शक माझ्याकडे हिंदी चित्रपटांच्या ऑफर घेऊन येतात. पण अद्याप तामिळ किंवा तेलुगू भाषिक चित्रपट घेऊन माझ्याकडे कोण आले नाहीत.

सलमान आणि कतरिना कॅफ स्टारर टायगर 3 लवकरंच रिलीज होणार आहे. ‘टायगर 3’ सिनेमा सलमानच्या ‘टायगर’ या अॅक्शन मलिकेतील एक चित्रपट आहे. 14 फेब्रुवारीपासून ‘टायगर 3’ च्या शूटिंगला दिल्लीत सुरूवात झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलेय. ‘टायगर 3’ चित्रपटात सलमान खान पुन्हा रॉ एजंटच्या भूमिका साकरत आहे. तर कतरिना आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारतेय.तर अभिनेता इमरान हाश्मी देखील या चित्रपटात खलनायकेच्या भूमिकेत दिसेल.


Tom Parker Death : ‘द वाँटेड’ फेम ब्रिटिश सिंगर टॉम पार्करचे निधन, मेंदूच्या कॅन्सरशी देत होता झुंज

First Published on: March 31, 2022 11:49 AM
Exit mobile version