Tom Parker Death : ‘द वाँटेड’ फेम ब्रिटिश सिंगर टॉम पार्करचे निधन, मेंदूच्या कॅन्सरशी देत होता झुंज

The Wanted singer Tom Parker passes away at 33 due to brain tumour
Tom Parker Death : 'द वाँटेड' फेम ब्रिटिश सिंगर टॉम पार्करचे निधन, मेंदूच्या कॅन्सरशी देत होता झुंज

‘द वॉन्टेड’ या ब्रिटीश बँडचा गायक टॉम पार्कर याचे वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी निधन झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून ब्रेन ट्यूमरने त्रस्त होता. त्यावर एका रुग्णालयात उपचारही सुरू होते, परंतु बुधवारी (30 मार्च) त्याने जगाचा निरोप घेतला आहे. टॉमच्या निधनाची माहिती त्याची पत्नी केल्सीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.

2020 मध्ये टॉमला ‘या’ आजाराचे निदान हा आजार

ऑक्टोबर 2020 मध्ये टॉमला कर्करोग झाल्याचे निदान झाले, त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी सुरू होती. यावेळी टॉमने ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. तो म्हणाला की, मला त्या वेळी माहित होते की, काहीतरी बरोबर नाही, परंतु असे होईल असे कधीच वाटले नव्हते.

पत्नीची भावनिक पोस्ट

टॉमची पत्नी केल्सीने कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘टॉमने आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत या जगाचा निरोप घेतला. आम्ही दु:खी आहोत टॉम आमच्या जगाचा केंद्रबिंदू होता आणि आम्ही त्याच्या स्मित आणि उत्साही उपस्थितीशिवाय जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. संपूर्ण वेळ टॉमची काळजी घेण्यात आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तो शेवटपर्यंत लढला आणि मला त्याचा सदैव अभिमान असेल. टॉम आणि केल्सी यांनी 2018 मध्ये लग्न केले. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने त्याच्या बँडसोबत स्टेज परफॉर्मन्स दिला होता. यापूर्वी तो म्हणाला होता की, ‘मी कॅन्सरकडे दुर्लक्ष करतोय असे नाही, पण मला त्याकडे लक्ष द्यायचे नाही. तुम्ही त्याकडे जितके जास्त लक्ष द्याल तितके ते तुमच्या आयुष्याचा ताबा घेते आणि मला ते माझ्या आयुष्यावर कब्जा करू द्यायचे नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kelsey 💋 Parker (@being_kelsey)

बँड यांनी ही पोस्ट केली

त्याच्या मृत्यूची बातमी शेअर करताना, त्याच्या बँडने लिहिले, ‘मॅक्स, जय, शिवा, नॅथन आणि संपूर्ण वाँटेड कुटुंब आमचे साथीदार टॉम पार्करच्या अकाली निधनाने खूप दुःखी आहे. ३० मार्च रोजी दुपारी त्यांचे कुटुंबीय आणि बँड साथीदारांच्या उपस्थितीत निधन झाल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.