भारतातील ‘छेलो शो’ आणि ‘RRR’चे ऑस्करमध्ये नामांकन

भारतातील ‘छेलो शो’ आणि ‘RRR’चे ऑस्करमध्ये नामांकन

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड साइंसेस’कडून 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी शॉर्टलिस्ट चित्रपटांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 10 कॅटेगरींमध्ये शॉर्टलिस्ट चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉक्यूमेंट्री आणि इंटरनॅशनल फीचर, डॉक्यूमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट, ओरिजनल स्कोर यांचा समावेश आहे.

‘छेलो शो’ आणि ‘RRR’चा ऑस्करमध्ये सहभाग
गुजराती भाषेतील ‘छेलो शो’ चित्रपटाचा ‘अंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ या श्रेणीमध्ये सहभागी करण्यात आलं आहे. तर RRR चित्रपटाला ‘नातू नातु’ साठी संगीत श्रेणीमध्ये सहभाग मिळाला आहे. या व्यतिरिक्त ‘सर्वोत्कृष्ट अंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ या श्रेणीमध्ये ‘अर्जेंटीना 1985’, ‘द क्विट गर्ल’, ‘द ब्लू काफ्तान’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर पहिल्यांदाच पाकिस्तानमधील एका चित्रपटाला देखील ऑस्करमध्ये सहभाग मिळाला आहे.

‘RRR’चित्रपटातील ‘नातू नातु’ गाण्यासोबतच ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ मधील ‘नथिंग इज लॉस्ट’, ‘ब्लँक पँथर: वकंडा फॉरएवर’ मधील ‘लिफ्ट मी अप’, ‘टॉप गन: मेवरिक’ मधील ‘होल्ड माय हँड’ यांसारख्या विविध 83 ट्यून्यसमधील 15 गाण्यांचा समावेश आहे. ऑस्करसाठी नॉमिनेशन वोटिंग 12 ते 17 जानेवारीपर्यंत असेल. या नॉमिनेशन लिस्टची घोषणा 24 जानेवारी रोजी करण्यात येईल. 95वां ऑस्कर 12 मार्च रोजी हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये होईल.

‘कांतारा’ चित्रपटाचा देखील समावेश
ऋषभ शेट्टीचा कांतारा चित्रपट भारतात प्रचंड लोकप्रिय ठरला. त्यामुळे या चित्रपटाला ऑस्करमध्ये पाठवण्याचा निर्णय कांताराच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

 


हेही वाचा : 

First Published on: December 22, 2022 10:23 AM
Exit mobile version