वो टॅलेंट ही क्या; जो किसी के काम ना आए!

वो टॅलेंट ही क्या; जो किसी के काम ना आए!

इंडियाज गॉट टॅलेंट

ही टॅग लाईन आहे छोट्या पडद्यावरील नवीन रिअॅलिटी शोची. येत्या शनिवार, २० ऑक्टोबरपासून कलर्न वाहिनीवर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा रिअॅलिटी शो दाखवला जाणार आहे. आधीच्या सीजनप्रमाणेच याही वेळी शोच्या परिक्षकांच्या भूमिकेत दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री किरण खेर आणि मालयक अरोरा असणार आहेत. यंदाचा या शोचा आठवा सीजन असून आपल्या टॅलेंटचा योग्य वापर करावा हा संदेश यामध्ये देण्यात येणार आहे.

इंजियाज गॉट टॅलेंट या मंचाने ‍सर्वांत यशस्वी रिॲलिटी टेलिव्हिजन फॉरमॅट म्हणून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नांव नोंदवले आहे. कलर्सवरील हा आठवा मौसम म्हणजे कलर्स सारख्या चांगल्या भागिदारा बरोबरचा एक उत्तम कार्यक्रम ठरला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांमधील कला भारतीय प्रेक्षकांपर्यंत आणतांना आंम्हाला आनंद होत आहे. आंम्हाला आशा आहे आणि आमच्या अनुभवानुसार असे दिसून येते की अशा प्रकारची कौशल्ये यामुळे लोकांना चांगले मनोरंजन उपलब्ध होऊ शकेल.
– आराधना भोला, व्यवस्थापकीय संचालिका, फ्रेमेंटल मिडिया प्रायव्हेट लि.

कौशल्याच्या आधारावर कलाकारांची निवड

फ्रेमेंटल मिडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा याची निर्मिती करण्यात येत असून इंडियाज गॉट टॅलेंटचे सूत्रसंचालन हे भारती सिंग आणि हृत्विक धनजानी करणार आहे. हा शो दर शनिवार-रविवार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सीजनचे घोषवाक्य ‘वो टॅलेंट ही क्या जो दुसरों के काम ना आए’ असे असून त्यानुसार या तुम्हाला ऐकलेल्या गोष्टी पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या कलांमध्ये टेक्नो आर्ट, सीआरपीएफ महिलांकडून करण्यात आलेल्या बाईक वरील कसरती, पाण्यातील आणि हवेतील कसरती, आकर्षक दृष्टीभ्रम, मल्लखांब आणि प्रथमच ३ डी प्रोजेक्शनसह होलोग्राफीक इंटरॲक्टिव्ह कला यांचा समावेश असणार आहे. संपूर्ण देशभरांतून तसेच सर्व सामाजिक स्तरांतून सर्वोत्कृष्ट कलाकार निवडण्यासाठी कलाकारांना हुनर का दरवाजा पार करून यावे लागणार आहे. ही निवड केवळ कौशल्यावर आधारीत केला जाते.

First Published on: October 18, 2018 4:29 PM
Exit mobile version