‘मिशन: इम्पॉसिबल’च्या सेटवर घुसखोरांचा हल्लाबोल,टॉम क्रूझने केला कडक पोलीस बंदोबस्त

‘मिशन: इम्पॉसिबल’च्या सेटवर घुसखोरांचा हल्लाबोल,टॉम क्रूझने केला कडक पोलीस बंदोबस्त

'मिशन: इम्पॉसिबल’च्या सेटवर घुसखोरांचा हल्लाबोल,टॉम क्रूझने केला कडक पोलीस बंदोबस्त!

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुज(Tom Cruise) सध्या आगामी सुप्रसिद्ध चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल’ च्या 7 व्या भागाच्या  चित्रिकरणात सध्या कमलीचा व्यस्त आहे. पण शूटिंग दरम्यान त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ च्या शूटिंग लोकेशन दरम्यान काही लोकांनी सेटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या घटेन नंतर टॉमला सेट वर सुरक्षा रक्षकांना बोलावणे भाग पडले.फिल्मचं शूटिंग सध्या उत्तर इंग्लड मधील यॉर्कशायर शहरामध्ये सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चित्रिकरण लवकरात लवकर उरकण्याचा प्रयत्न अभिनेता टॉम क्रुज करत आहेत. पण शूटिंगवेळेस घडेलेल्या घटनेमुळे टॉम सध्या खूप त्रस्त झाला आहेत. सूत्रानुसार असे सांगण्यात येत आहे की,या चित्रपटाचे शूटिंग अगदी मोठ्या मोकळया ठिकाणी केले जात आहे, जिथे चित्रपटाचा खूप मोठा सेट उभारण्यात आला आहे. तसेच ही जागा अत्यंत मोकळी असल्या कारणामुळे त्याचे संरक्षण करणे सोपे नाही. यामुळे बर्‍याच वेळा लोक चित्रपटाच्या सेटच्या जवळ येतात,आणि शूटिंगसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूंना वारंवार हात लवतात . तसेच चित्रपटाच्या शूटिंगसाठी  आलेल्या स्टंटच्या  वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आम्हाला पोलिसांना फोन करावा लागला, गेल्या आठवड्यात देखील अशीच एक घटना घडली होती. पण त्यावेळी टॉमने या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. यावेळेस मात्र सेटवर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला असून कडक तपास सुरू आहे. ”

‘मिशन इम्पॉसिबल’ सिरिजच्या पुढच्या भागाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत. 22 मे 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हे हि वाचा – सलमानसोबत २६ वर्षे असणाऱ्या बॉडीगार्ड शेराने पहिल्या भेटीचा केला खुलासा

First Published on: May 10, 2021 1:44 PM
Exit mobile version